“संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी”, रोहित पवारांचा सुषमा अंधारेना सल्ला

| Updated on: Dec 15, 2022 | 12:59 PM

रोहित पवारांचा सुषमा अंधारेना सल्ला...

संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी, रोहित पवारांचा सुषमा अंधारेना सल्ला
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या एका वक्तव्यामुळे वादात अडकल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संतांच्या किंवा महापुरुषाच्या बाबतीत चुकीचं विधान करू नये. तसं विधान केल्यास माफी मगितली पाहिजे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीने संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये”, असंही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे एका वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. “संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं?”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेला व्हीडिओ सध्या चर्चेत आला आहे. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तोच दाखला देत अंधारेंनी हे वक्तव्य केलं. पण त्यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.सुषमा अंधारे यांनी माफी मागावी अशी मागणी झाली.

सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफीही मागितली आहे. वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही,असं म्हणत त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

मोर्चाबाबत रोहित पवार काय म्हणाले?

मोर्चाला आज संध्याकाळपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राजकारण आणू नये.राजकीय बदल घडावा म्हणून आम्ही मोर्चे काढत नाही आहोत. सगळ्या गोष्टीत राजकारण आणत नाहीयेत. महाराष्ट्राची अस्मिता जपापी म्हणून मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे मोर्चाला परवानगी मिळणं आवश्यक आहे, असं रोहित म्हणालेत.