मुंबई : राष्ट्रवादी आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार खोटं बोलले, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याला ट्वीटच्या माध्यमातून रोहित पवारांनी उत्तर दिलंय. इतकंच काय, तर शरद पवार खोटं बोलले, हे मान्यही केलंय. मात्र हे मान्य केल्यानंतर त्यांनी नेमकं असं का केलं, याचं कारणही सांगितलंय. शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेन (Babasaheb Purandare & James Lane) या सगळ्याभोवतीचा वाद पुन्हा चर्चेत आलाय. शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर करत या सगळ्या वादावर पहिल्यांदाच रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली. एकूणच हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत शरद पवारांवर टीका करताना इतिहासावरुन वक्तव्य केलं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यांना शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेत जळगावात उत्तर दिलं होतं. त्यानंतर भाजप आमदारांनीही पवारांना जोरदार टीका केली. त्या सगळ्या टीकेला आता रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत पलटवार केलाय.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासोबत एका मुलाखतीदरम्यान, बातचीत करताना शरद पवारांनी 1993 साली झालेल्या बॉम्पस्फोटाविषयी सांगितलंय. एकूण 6 मिनिटं 33 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये शरद पवारांनी या बॉम्बस्फोटाचं नेमकं कारण काय होतं, हे सांगितलंय. हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतून बॉम्बहल्ला झाल्याचा संशय तेव्हा आल्याचं पवारांनी म्हटलंय. म्हणून शरद पवारांनी यावेळी 11 ऐवजी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, असं सांगितलंय. आणि यातलं बारावं ठिकाण हे मश्जिद बंदर होतं, असाही खुलासा शरद पवारांनी यावेळी मुलाखतीमध्ये दिला.
हल्ला करणाऱ्यांना धर्माच्या दंगली घडवायच्या होत्या. मात्र एकाच धर्माच्या केंद्रस्थानी हल्ले झालेले आहेत, असा संदेश जाऊ नये, म्हणून मी त्यावेळी खोटं बोललो होतो, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.
दहशतवादी हल्ल्याला तोंड देताना मुंबई कुठेही घाबरलेली नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. त्यासाठी 22-22 तास यंत्रणा राबली होती. मुंबईच्या लोकांमुळे हे सगळं सुरु झालं, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलंय.
राज ठाकरेंनी केलेल्या उत्तरसभेतील टीकेवर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी जेम्स लेन प्रकरणावरुन शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा माफीनामाच वाचून दाखवलेला. तर दुसरीकडे जेम्स लेननं दिलेल्या स्पष्टीकरणात आपण कधीच बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो किंवा बोललो नसल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता सर्व विरोधकांनी शरद पवारांवर टीका निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.
‘पवार साहेब खोटं बोलले’, असा आरोप विरोधकांनी केला…
आम्ही म्हणतो हो बोलले!
पण ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्यांना लोकांपासून लपवून ठेवायचंय!
खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ!@PawarSpeakshttps://t.co/9A8u05PWpq— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022
राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय…म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप करून ६ दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022