आईने सांगितलेला शर्ट घालून, शरद पवारांनी दिलेला संदेश घेऊन रोहित पवार रवाना

| Updated on: Oct 03, 2019 | 10:42 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar Nomination Form) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

आईने सांगितलेला शर्ट घालून, शरद पवारांनी दिलेला संदेश घेऊन रोहित पवार रवाना
Follow us on

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar Nomination Form) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या 77 जणांच्या पहिल्या यादीत रोहित पवार (Rohit Pawar Nomination Form) यांचं नाव आहे. भाजप नेते आणि मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्याविरोधात रोहित पवार मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

रोहित पवार यांनी आज पिवळा शर्ट घातला होता. नवरात्रोत्सवानिमित्त 9 दिवस 9 रंगाचे कपडे परिधान करतात. म्हणजेच रंग फॉलो केले जातात. त्याबाबत रोहित पवार यांना आज त्यानिमित्तानेच रंग फॉलो केला की काय असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर रोहित पवार म्हणाले, “मला आईने सांगितलं, हा कलर घाल, त्यामुळे मी हा शर्ट घातला. कारण माझा आईवर विश्वास आहे”.

शरद पवार, अजित पवारांचा फोन

शरद पवार यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं. स्वत:वर विश्वास ठेव, लोकांवर विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत कष्ट घे, असे त्यांचे शब्द होते, असे रोहित पवारांनी सांगितलं.

आज आणि उद्या अजित पवारांचे वेगवेगळे कार्यक्रम बारामतीत आहेत. उद्या त्यांचा फॉर्म भरणार आहेत, मी त्याठिकाणी जाणार आहे. माझं कुटुंब, माझे काका, शिक्षक, सासरे, जनता, मित्र माझ्यासोबत आहेत. जिथे सभा होतील, तिथे आमचे कार्यकर्ते आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

राम शिंदेंनाविरोधात लढत नाही

मी सतत हेच सांगतोय की माझी लढत राम शिंदेंविरोधात नाही, तर माझी लढत अशा विचाराविरोधात आहे, जो विचार सर्वसामान्यांना विश्वासात घेतलं नाही. इथल्या लोकांना विकासापासून वंचित ठेवलं. त्याविचाराविरोधात मी लढत आहे. पुढचा व्यक्ती किती तगडा असला, तरी आपण किती कष्ट घेतो, लोकांचा किती विश्वास संपादन करतो ते महत्त्वाचं आहे, असं रोहित यांनी सांगितलं.

कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेऊन रोहित पवार अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. अक्काबाई मंदीरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार  आहे. त्यानंतर सभा होणार आहे.