RSS : यामुळेच भारताचे झाले विभाजन, RSS चे दिवाळीपूर्वीच फटाके..

| Updated on: Oct 19, 2022 | 7:54 PM

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताच्या विभाजानची आठवण करुन देत, नागरिकांना या मुद्यावर सतर्क केले आहे..

RSS : यामुळेच भारताचे झाले विभाजन, RSS चे दिवाळीपूर्वीच फटाके..
यामुळेच झाले देशाचे विभाजन
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

प्रयागराज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सध्या बहुचर्चेत आहे. संघांचे सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagavat) यांच्या सामाजिक समरसतेवर काही दिवसांपूर्वी मोठी चर्चा झाली. पण संघाची काही धोरणे जगजाहीर आहेत. त्यावरची संघाची भूमिका तसूभरही बदललेली नाही. राष्ट्राचा विचार सर्वप्रथम मानणाऱ्या संघाने देशाचे विभाजन (partition) या घटकामुळे झाल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे.

आरएसएसने पुन्हा एकदा लोकसंख्येचा राग आळवला आहे. लोकसंख्येच्या विस्फोटावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. आरएसएसचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी लोकसंख्या वृद्धीदर काबूत ठेवण्यासाठी एक व्यापक धोरण आखण्याचे आवाहन केले आहे.

धर्मांतरामुळेही हिंदूची संख्या सातत्याने कमी होत असल्याचा दावा होसबळे यांनी केला आहे. देशातील अनेक भागात धर्मांतर सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या सीमावर्ती भागात घुसखोरीवरही होसबळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

लोकसंख्येच्या असंतुलनामुळेच या देशाला विभाजन पहावे लागले. विभाजनासाठी लोकसंख्येचे असंतुलनच कारणीभूत ठरल्याचा दावा त्यांनी केला. तेव्हा लोकसंख्येला आळा घालण्यासाठी उपाय योजना करण्यावर भर द्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे. केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण ठरवत असल्याच्या चर्चाही या दरम्यान रंगल्या आहेत.

गेल्या 40-50 वर्षांत लोकसंख्या नियंत्रणावर सातत्याने जोर देण्यात आला. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची सरासरी सदस्य संख्या 3.4 वरुन थेट 1.9 आल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणामुळे एक वेळ अशी राहिल की देशातील तरुण पिढी गायब होईल आणि वृद्धांची संख्या जास्त असेल, असे होसबळे यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे राष्ट्रीय स्वयंयसेवक संघाने चार दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी होसबळे यांनी संघ शाखेच्या विस्ताराची चर्चा ही केली.