पणजी : भारतीय जनता पक्ष (भाजप) म्हणजे हिंदू समाज नाही आणि भाजपला विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाला विरोध करण्यासारखं नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलं आहे (Bhaiyyaji Joshi on BJP and Hindu). ते गोव्यातील एका कार्यक्रमात ‘विश्वगुरु भारत, आरएसएसचे दृष्टीकोन’ या विषयावर बोलत होते.
भैय्याजी जोशी म्हणाले, “भारतीय जनता पक्ष (भाजप) म्हणजे हिंदू समाज नाही आणि भाजपला विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाला विरोध करण्यासारखं नाही. राजकीय लढाई सुरुच राहणार आहे. त्याला हिंदूंशी जोडू नका.”
Suresh Bhaiyyaji Joshi, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) general secretary in Goa: Hindu community does not mean Bharatiya Janata Party, and opposing BJP does not amount to opposing Hindus. Political fight will continue but it should not be linked to Hindus. pic.twitter.com/XBal0PM9zF
— ANI (@ANI) February 9, 2020
भारतात काम करु इच्छिणाऱ्यांनी हिंदूंसोबत त्यांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. प्राचीन काळापासून हिंदूंनी भारताचा उदय आणि पतन पाहिलं आहे. त्यामुळे भारताला हिंदू समाजापासून वेगळे करुन पाहता येणार नाही. हिंदू नेहमीच या देशाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत, असंही भैय्याजी जोशी यांनी सांगितलं.
दरम्यान, संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेने भाजपची काही प्रमाणात अडचण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपमध्ये देखील दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
संबंधित बातम्या :
मुस्लिमांबाबत कधीही भेदभाव नाही, संघ मुख्यालयावर ध्वजारोहणानंतर भय्याजी जोशींची प्रतिक्रिया
संबंधित व्हिडीओ :