‘पंतप्रधान मोदींना यूक्रेनमधील विद्यार्थ्याचं काही पडलेलं नाही’, शरद पवारांचं टीकास्त्र, महाराष्ट्र भाजपवरही घणाघात

| Updated on: Mar 02, 2022 | 11:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीकास्त्र डागलंय. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत पवार बोलत होते.

पंतप्रधान मोदींना यूक्रेनमधील विद्यार्थ्याचं काही पडलेलं नाही, शरद पवारांचं टीकास्त्र, महाराष्ट्र भाजपवरही घणाघात
शरद पवार, नरेंद्र मोदी
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला (Russia Ukraine War) आता भीषण स्वरुप मिळालं आहे. अशावेळी यूक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी युद्धाच्या संकटात अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) हाती घेण्यात आलं आहे. आतापर्यंत 6 हजार विद्यार्थ्यांना भारतात परत आणल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीकास्त्र डागलंय. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत पवार बोलत होते.

‘..म्हणून यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत’

यूक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरु आहे त्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. त्या संकटाकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत. पालक आणि विद्यार्थी प्रचंड त्रास सहन करत आहेत. युनोमध्ये बैठक घेतली तेव्हा भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही. यूक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, अस शरद पवार यांनी म्हटलंय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

‘पंतप्रधान मोदींना विद्यार्थ्यांचे काही पडलेले नाही’

त्याचबरोबर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना, मोदी सरकारचे 4 मंत्री तिकडे गेले आहेत. पण एकही मंत्री यूक्रेन किंवा रशियात गेला नाही. केंद्र सरकारची चर्चेसाठी तयारी नाही. राहुल गांधी आणि आम्ही सर्व विरोधात चर्चेला तयार होतो. मात्र, पंतप्रधान मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडलेले नाही, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केलीय.

‘सरकार चांगलं काम करत आहे म्हणून अनेकजण अस्वस्थ’

अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत बोलताना पवार म्हणाले की, उद्याच्या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणलं आहे. तुमचे सरकार चांगलं काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ मी पाहिलं नाही. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचं असतं आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते. पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे, अशा शब्दात पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

ईडी कारवाईवरुनही पवारांनी भाजपवर टीका

नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईवरुनही पवारांनी भाजपवर टीका केलीय. नवाब मलिक यांना आत टाकलं तेव्हा ममता बॅनर्जी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे चार लोकांना अटक झाली. मात्र आम्ही हटलो नाही तर लढलो, संघटना वाढवली, तुम्हीही तेच करा. नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. लोक तुमच्या बरोबर आहेत. लोकांचा पाठिंबा आहे. त्यांच्याशी असलेल्या बांधिलकीशी तडजोड करायची नाही, असा सल्लाही पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलाय.

इतर बातम्या :

‘सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पिलू वळवळ करत होतं आता ते आमच्यावर फुत्कारतंय’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Russia Ukraine War : आतापर्यंत 17 हजार भारतीयांनी यूक्रेनची सीमा ओलांडली; तर पंतप्रधान मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक