मुंबई – “घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच दुटप्पीपणे वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगोमे आत आणून विधिमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात. महाराष्ट्रात (Maharashtra) असे वर्तन व राजकारण कधीच घडले नव्हते. शिवरायांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Tackeray) यांच्या शपथा घेऊन हे पाप कोणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही. आता प्रश्न राहिलाय गेल्या अडीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या 12 नामनियुक्त विधान परिषद सदस्यांचा. आता नवे सरकार आले आहे. त्यामुळे या फाईलच्या जागी नवी फाईल आणून ती राज्यपालांच्या सहीने मंजूर होईल व पेढे भरवण्याचा कार्यक्रम पुनः पुन्य होत राहील काळ मोठा कठीण आला आहे हे खरे, पण हा काळाकुट्ट काळी निघून जाईल!” सामाना (Saamana) अग्रलेखातून भाजपवरती जोरदार टीका केली आहे.
शिंदे गटाच्या आमदारांच्या जोरावर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्र्याप्रमाणेच विधानसभेत अध्यक्ष राहुल कर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणवून घेणारे गृहस्थ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजप असा प्रवास करीत ते विधानसभा अध्यक्षपदापर्यंत आहे. शिंदे गटाने बंड केल्यापासून सामना अग्रलेखातून भाजपवरती अनेक थेट निशाना साधला गेलाय. त्याचबरोबर काल राजकीय घडामोडीवरती सामनाच्या अग्रलेखातून पु्न्हा टीका केली आहे.
“ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल तसा नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना त्याच आनंदाच्या भरात राज्यपालांनी पेढा भरवून आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना देखील हा आनंद झाला नव्हता. बहुधा राजभवन परिसरातील दुकाने बंद पडली असावीत. शरद पवार म्हणतात ते विधान गमतीचे असले तरी खरेच आहे. मी आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्री झालो, पण राज्यपालांनी एकदाही पेढा भरवला नाही, असे शरद पवार म्हणाले ते बरोबरच आहे. कारण राज्यपाल हा तटस्थ व घटनेचा रखवालदार असतो. मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाचा आला-गेला तरी त्यांना फरक पडत नाही, पण गेल्या दोन-चार वर्षांत महाराष्ट्रातील राजभवनात वेगळेच चित्र दिसत आहे”