राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कश्यासाठी? सामनातून कारण सांगितलं…

| Updated on: Sep 13, 2022 | 9:41 AM

आजच्या सामानातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सांगण्यात आलं आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कश्यासाठी? सामनातून कारण सांगितलं...
Follow us on

मुंबई : आजच्या सामानाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सांगण्यात आलं आहे. राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ , ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठी असल्याचं सामनात म्हणण्यात आलं आहे. “देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी करतात व ‘ भारत जोडो ‘ यात्रा (Bharat Jodo Yatra)अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे . राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ , ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठीच आहे . त्यांनी पाच हजाराचे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय , फरक पडत नाही . राहुलवरील टीका भाजपास मात्र उघडे पाडीत आहे . ‘ कर्तव्यपथा ‘ वरील पोटदुखीने काय साध्य होणार!”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपची पोटदुखी वाढू लागली आहे. डोकेदुखी नैसर्गिक आहे. राजकीय पोटदुखी ही एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून जन्मास येते. पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांतून बाहेर पडतात. भाजप प्रवक्त्यांनी असे किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे, असं म्हणत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ पदयात्रेत जे ‘टी शर्ट’ वापरत आहेत त्याची किंमत 41 हजार रुपये असल्याची माहिती भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार? राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. ‘भारत जोडो’ ही एक चांगली संकल्पना आहे, असं म्हणत काँग्रेसच्या मोहिमेला सामनातून पाठिंबा देण्यात आला आहे.