मुंबई – कोरोनाची (Corona) तिसरी लाट (Third Wave) ओसरली असे वाटत असताना कोवीडच्या विषाणूची वळवळ पुन्हा सुरू झाली आहे. चीनमधून आलेल्या कोविडच्या विषाणूने पुन्हा एकदा चीनमध्ये थैमान घालायला सुरूवात केली आहे. रोज 20 हजाराहून अधिक रूग्ण दाखल होत आहेत. चीनच्या 44 शहरात कडक लॅाकडाऊन लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटांनी आपल्याला आगोदरचं खूप पोळले आहे. देशवासीयांनी खूप हाल सोसले आहेत. त्यामुळे चौथी लाट दारात रोखायची असल्यास ताकही फुंकूनच प्यावे लागेल. कोरोणाच्या चौथ्या लाटेला आळा घालायचा असेल तर मास्कचा वापर अनिवार्य करणे हाचं पहिला पर्याय असू शकतो असं आजच्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखात म्हटलं आहे.
मागच्या चार दिवसांपासून भारत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरूवात झाली आहे. दोन हजाराने रूग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा धास्तावल्याचं चित्र आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रूग्णांचा आकडा दोन हजारांच्या पलीकडे गेला आहे. काल दिवसभरात कोरोनाची चाचणी केली असता दोन हजार तीनशे ऐंशी रूग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती मिळाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत युपी आणि दिल्लीत कोरोना बाधीत रूग्णांची संख्या अधिक आहे.
सध्या कोरोना रूग्णांची होणारी वाढ ही केंद्र सरकार आणि देशातील राज्यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांच्या मृत्यूचं प्रमाण अत्यल्प होतं. पण पहिल्या दोन लाटेत देशाचं अर्थिक गणित बिघडवून टाकलं. सध्या कुठेतरी लोकांना आशेचा किरण दिसत होता. परंतु चौथ्या लाटेने आता दारावर धडक दिली आहे. केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्रं पाठवून त्यांना कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मिरोझम या राज्यांचा समावेश आहे. मधल्या काळात कोरोनाना आटोक्यात आल्याची चिन्हं दिसत होती. परंतु कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वरती काढल्याने अनेक राज्यांसाठी पुन्हा डोकेदुखी ठरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.