मुंबई : राज्यसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीचं (Legislative Council Election) वारं वाहतंय. सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मागे घेतला. तसंच शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरलेला होता तोही अर्ज आता मागे घेण्यात आला आहे. पण काँग्रेसने आपला अर्ज मागे न घेतला नाही. जर दोन्ही बाजूने पाच-पाच उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक मविओचे 6 उमेदवार विरूद्ध भाजपचे 5 उमेदवार अशी रंगणार आहे.
सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तो निवडणूक अर्ज सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला. तसंच शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरलेला होता तोही अर्ज आता मागे घेण्यात आला आहे. पण काँग्रेसने आपला अर्ज मागे न घेतला नाही.
जर दोन्ही बाजूने पाच-पाच उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक मविओचे 6 उमेदवार विरूद्ध भाजपचे 5 उमेदवार अशी रंगणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याआधी सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यसभा निवडणुकीतील चमत्काराची पुनरावृत्ती होणार”, असं सदाभाऊंनी म्हटलंय. राज्यसभा निवडणुकीत जो चमत्कार देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला तोच चमत्कार विधानपरिषदेतही दिसणार आहे,असा विश्वास सदाभाऊंनी बोलून दाखवला. पण पुढच्या काही मिनिटात त्यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला.
सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला. त्यानंतर आता भाजपचे अधिकृत 5 उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढवतील. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे 5 उमेदवार आता भाजपकडून विधान परिषदेची निवडणूक लढवतील.