“पवारांनी येरवडा तुरुंगात महात्मा गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच राहावं”

| Updated on: Oct 13, 2019 | 9:30 PM

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर (Sadabhau Khot on Sharad Pawar) सडकून टीका केली आहे.

पवारांनी येरवडा तुरुंगात महात्मा गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच राहावं
Follow us on

सोलापूर: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर (Sadabhau Khot on Sharad Pawar) सडकून टीका केली आहे. शरद पवारांनी येरवडा तुरुंगात जाऊन महात्मा गांधींच्या शेजारची खोली (Mahatma Gandhi Yerwada Jail Room) घ्यावी आणि तेथेच रहावं, असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी पवारांना (Sadabhau Khot on Sharad Pawar) दिला आहे. ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे आले होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, “शरद पवार येरवडामध्ये गेले, तर त्यांनी महात्मा गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच राहावं. तुरुंगात गेल्यानंतर आघाडीच्या काळात आमच्यावर गुन्हे करणाऱ्या पवारांना आमचं दुःख काय असतं हे कळेल.”

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “आम्ही शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आघाडी सरकारने कितीतरी गुन्हे आमच्यावर दाखल केले. त्यातील अनेक गुन्हे तर आम्ही तेथे नसताना आमच्या नावावर टाकले. एकदा तर मी येरवड्यात असताना माझ्यावर कराडमध्ये टँकर फोडल्याचे गुन्हे दाखल केले. त्यामुळं आमचे अनेक दिवस कोर्टात हेलपाटे मारण्यातच गेले.”

शरद पवारांनी एकदा तरुंगात जाऊन आतली हवा कशी आहे ते पाहून यावं. आतमध्ये जेवायला काय मिळतं ते देखील त्यातून समजेल, असंही खोत म्हणाले. खोत यांनी पवारांनी ईडीच्या नोटीस प्रकरणात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला.