मुंबई : मागच्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक परेशान झाले आहेत. टोमॅटोचा दर (tomato prices) दीडशे ते दोनशे रुपये झाल्यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर टोमॅटोची अधिक चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर काही मीस्म सुध्दा व्हायरल झाले आहेत. काल सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांनी केलेल्या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी मराठी अभिनेत्याने देखील टोमॅटोच्या बाबत एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. त्याचा सुध्दा खोत यांनी चांगलाचं समाचार घेतला. त्यानंतर त्या अभिनेत्याने आपलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावरुन हटवलं होतं.
अवकाळी पाऊस, मान्सूनचं उशिरा आगमन यामुळे पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. सामान्य नागरिक वाढलेल्या दरांमुळे अधिक परेशान झाला आहे. टोमॅटो दर इतके वाढले आहेत की, केंद्र सरकार आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून टोमॅटो खरेदी करणार आहे.
काल बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही असं वक्तव्य सुनिल शेट्टी याने केलं होतं.” या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
आजकाल मी टोमॅटो कमीच खातो लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते – सुनील शेट्टी
जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 14, 2023
काल ज्यावेळी सुनिल शेट्टी यांनी वक्तव्य केलं, त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती अधिक लोकांनी टीका केली. देशातील इतर महागाई दिसत नाही का ? त्यावर सुध्दा बोलत जा असा नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की, जेवणात टोमॅटो खाल्ला नाही म्हणून कोणाचा मृत्यू झाला आहे का ? इतर पालेभाज्या आहेत त्या खा ? काही दिवसात सगळ्या पालेभाज्यांचे दर उतरतील असंही खोत म्हणाले.