नवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, तेव्हा जे झालं ते झालं, ते सोडा तुम्ही (मोदी सरकार) गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले. 1984 चं प्रकरण हा भूतकाळ आहे, आत्ताचं बोला, असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.
पंजाबमधील प्रचारात 1984 ची शिख दंगल हा मुद्दा बनवला जात असून त्याला दिवंगत पंतप्रधान जबाबदार होते, असा भाजपचा आरोप आहे. यावर सॅम पित्रोदा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही (सरकार) तर रोज खोटं बोलता, 1984 चं आत्ता काय आलं? तुम्ही पाच वर्षात काय केलं त्याविषयी बोला. 1984 ला जे झालं ते झालं, तुम्ही काय केलं? रोजगार निर्मितीसाठी तुम्हाला मत दिलं, ते तुम्ही केलं नाही. 200 स्मार्ट शहरांसाठी तुम्हाला मतदान मिळालं, पण तेही तुम्ही केलं नाही. तुम्ही काही केलं नाही म्हणून असे मुद्दे उकरुन काढले जात आहेत. थांबवा हे”.
#WATCH Sam Pitroda: Ab kya hai '84 ka? Aapne kya kiya 5 saal mein, uski baat kariye. '84 mein hua to hua. Aapne kya kiya? You were voted to create jobs. You were voted to create 200 smart cities. Aapne wo bhi nahi kiya. Aapne kuch nahi kiya isliye aap yahan wahan gup lagate hain. pic.twitter.com/9SMMUW5Hll
— ANI (@ANI) May 9, 2019
नानावटी आयोगाने शिख दंगलींची चौकशी केली होती, जो भारताचा मोठा नरसंहार होता. लोकांना मारण्याच्या सूचना थेट पंतप्रधान राजीव गांधींच्या कार्यालयातून आल्या होत्या, असा आरोप भाजपने एका ट्वीटच्या माध्यमातून केलाय. यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर या निवडणुकीत राजीव गांधींच्या नावाची एंट्री झाली. मोदींनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं संबोधलं होतं. त्यानंतर पुन्हा एक आरोप मोदींनी केला. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी युद्धनौका आयएनएस विराटचा वापर कौटुंबीक सुट्टी साजरी करण्यासाठी केला होता, असं मोदी म्हणाले.
VIDEO :