सांगली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosle) यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी बोलणे टाळले. उदयनराजे बिनडोक असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर उदयनराजे समर्थकांनी टीकेची झोड उठवली आहे. (Sambhaji Bhide reaction on Prakash Ambedkar’s criticism over Chhatrapati Udayanraje Bhosle)
सांगलीत संभाजी भिडेंना प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याविषयी भाष्य करण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “मला काही विचारु नका, मी यावर काही बोलणार नाही” असे म्हणत संभाजी भिडे यांनी उदयनराजेंवर झालेल्या टीकेवर मौन बाळगले.
“संभाजी भिडे कुठे आहेत?”
“प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. परंतु, माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मग तेच संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधानं केलं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे आता मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली
भिडे कुठे आहेत? माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत https://t.co/BsaJ7ye8Pk @rautsanjay61 #SambhajiBhide #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2020
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
उदयनराजे भोसले आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
संबंधित बातम्या:
उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं ‘ते’ वक्तव्य पटलं नाही; संभाजीराजेंची नाराजी
राजेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्तेंविरोधात साताऱ्यात गुन्हा
अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेना आवश्यक, पण उद्धवराव, राऊतांना हटवा : संभाजी भिडे
(Sambhaji Bhide reaction on Prakash Ambedkar’s criticism over Chhatrapati Udayanraje Bhosle)