मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहेत. त्या धामधुमीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide visit matoshree to meet uddhav Thackeray) हे नुकतंच मातोश्रीवर दाखल झाले आहेत. संभाजी भिडे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ते मातोश्रीवरुन निघून (Sambhaji Bhide visit matoshree to meet uddhav Thackeray) गेले. संभाजी भिडे अचानक मातोश्रीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नाही. संभाजी भिडे जवळपास 20 मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ (Sambhaji Bhide visit matoshree) शकली नाही.
भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपने अल्पमताचं सरकार नको असे राज्यपालांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे. त्यातच संभाजी भिडे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संभाजी भिडे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अचानक संभाजी भिडे मातोश्रीवर का आले? त्यांनी उद्धव ठाकरेंशी नेमकं काय बोलायचं होतं? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
Super exclusive: Uddhav Thackeray refused to meet Bhima Koregaon riot case accused Sambhaji Bhide, who had come at Matoshree with BJP RSS govt formation offer – Site Title https://t.co/w6rvVrPmsg
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 7, 2019
उद्धव ठाकरेंनी संभाजी भिडेंची भेट नाकारली, जितेंद्र आव्हाड यांचा दावा
उद्धव ठाकरे यांनी संभाजी भिडे यांना भेट नाकारल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनुसार, “संभाजी भिडे हे मातोश्रीवर संघ आणि भाजपकडून सत्तास्थापनेसंदर्भात प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली असेही आव्हाड यांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेचे स्पष्टीकरण
दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव हर्षल प्रधान यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संभाजी भिड़े गुरूजी अकस्मात मातोश्रीवर आले त्यावेळेस उद्धव साहेब घरी नव्हते , त्यामुळे त्याना भेट नाकारली असे म्हणणे अयोग्य आहे. असेही स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
कोण आहेत संभाजी भिडे?
भिडे गुरुजी किंवा संभाजी भिडे या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असल्याची माहिती आहे. संभाजी भिडे 85 वर्षांचे असून ते सांगलीत राहतात. त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील सबनीसवाडी आहे.
महाराष्ट्रात 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप होता.