कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) सहा जागांपैकी सहावी जागा अपक्ष लढवणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जाहीर केलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्याचं आवाहनंही केलं. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे संभाजीराजेंची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं संभाजीराजेंना पक्षात प्रवेश करुन शिवसेनेच्या (Shivsena) तिकीटावर तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही आणि शिवसेनेनं कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता संभाजीराजे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शक्यता आहे. अशावेळी संभाजीराजे उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या समर्थकांकडून संभाजीराजेंचा एक व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला जातोय. या व्हिडीओच्या माध्यमातून राजकीय पक्षांना थेट इशारा देण्यात आलाय.
संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचे रायगडावरील फोटो पाहायला मिळत आहेत. त्या फोटोसह या व्हिडीओत एक डायलॉगही ऐकायला मिळतोय. ‘शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. पण त्या आधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम उभी राहिली आहे त्याचं काय? संभाजीला समजून घेण्याकरिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजीचं करुन घ्यावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो’, असा डायलॉग या व्हिडीओत तुम्हाला ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हा इशारा नेमका कुणाला? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
Video : संभाजीराजे छत्रपती समर्थकांचा इशारा नेमका कुणाला? संभाजीराजेंचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल#SambhajirajeChhatrapati #RajyaSabha #RajyaSabhaElection #MahavikasAghadi #Shivsena #BJP
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा : https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/i8YQpMhHFM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2022
संभाजीराजे छत्रपती उद्या (27 मे) सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.
महाराज…
तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय…मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी…
मी बांधील असेन तो फक्त जनतेशी… pic.twitter.com/UnOir6CWSr— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 26, 2022
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक झालेले आहेत. ‘महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचं आहे. मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…’ असं ट्वीट करत संभाजीराजे यांनी एकप्रकारे आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे संभाजीराजे राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपलं कार्य पुढे नेण्याच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे.