मुंबई: वेदांता सारखा प्रकल्प (vedanta project) राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका, असंही मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) म्हणाले. मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. मुंबई (mumbai) फक्त मराठी माणसाचीच आहे. एखादा प्रकल्प गुजरातला जाणे हे योग्य नव्हे. गुजरात असं काय सोई सुविधा देत आहे याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा, असं आवाहनही संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतायत. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो याला फार महत्त्व नाही, असंही त्यांनी सांगितलं.