मुंबई : मनसे (MNS) आणि शिवसेनेमधील (Shiv sena) नेत्यांचा कायमच एकोंमेकांवर हल्लाबोल सुरू असतो. आता पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आपल्या या पत्रात संदीप देशपांडे यांनी मुंबईतील खड्डे आणि कोरोना काळातील उपाययोजनांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘आमदार फुटले, चिन्ह गेलं, सीएमपद गेल्यामुळे तुम्हाला सहानुभूती मिळाली, मात्र गेल्या 25 वर्षांपासून आम्ही खड्ड्यांमधून चालत आहोत आम्हाला सहानुभूती कधी भेटणार’? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी या पत्राद्वारे केला आहे.
संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहीलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संदीप देशपांडे यांनी मुंबईतील खड्डे आणि कोरोना काळातील उपाययोजनांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘आमदार फुटले, चिन्ह गेलं, सीएमपद गेल्यामुळे तुम्हाला सहानुभूती मिळाली, मात्र आम्ही 25 वर्ष खड्ड्यातून चालतोय आम्हाला कधी सहानुभूती मिळणार’? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना केला आहे.
दरम्यान एकीकडे मनसे नेत्यांची ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू असताना दुसरीकडे मात्र भाजप आणि शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मनसेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट अनौपचारिक असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ही भेट अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.