मुंबई – संजय राऊत (Sanjay Raut) काय बोलतात याला महत्व नाही. हे सरकार अडीचं वर्षे पूर्ण क्षमतेनं टिकणार आहे. अदित्य ठाकरेचा (Aditya Thackeray) दौरा झंझावत नाही. अदित्य ठाकरेच्या दौऱ्याला प्रतिसाद नव्हता. बाळासाहेबांचे सर्व लोक आमच्यासोबत, आम्ही दौरा काढला की लोक आमच्यासोबत दिसतील. एकनाथ शिंदेचा दौरा सुरू होणार आहे. शिंदेचा दौरा झंझावत सुरू होईल. संदीपान भुमरे (sandipan bhumre) वडापाव खाणारे नाही चटणी भाकर खाणारे आहेत असा टोला भुमरे यांनी संजय राऊतांना लगावला. संजय राऊत साहेबांचा तोल गेलेला आहे. सगळ्या आमदारांविषयी आम्हाला आदर आहे. आदित्य ठाकरे तीन वर्षापूर्वी दौरे काढले असते तर दौरे काढायची पाळी आली नसती. खरी शिवसेना आमची आहे. आम्हालाचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळणार आहे. ज्यावेळी निवडणुका येतील तेव्हा जागा दाखवून देवू, रँली काढून भावनिक होवू काही होत नाही असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेला सुद्धा लगावला.
शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या समर्थनार्थ काही दिवसांपुर्वी पैठण विधानसभा मतदारसंघातील धुळे-सोलापुर हायवे वर समर्थकांनी मोठी रॅली काढली होती. या रॅलीमध्ये शेकडो समर्थकांसह पारंपारिक वेशभूषा मध्ये अनेक बंजारा महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या. या वेळी या कार्यकर्त्यांनी संदीपान भुमरे एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या. संदिपान भुमरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहोत असे सुद्धा कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसैनिकांनी शिवसंवाद मेळाव्याप्रसंगी लोखंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांच्या भाषा दरम्यान शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची मेळाव्या स्थळी एंट्री झाली. शिवसैनिकांनी भावी खासदार असा उल्लेख करत घोषणा दिल्या. आदित्य ठाकरे यांनी बबनराव घोलपांचा हातात हात घेताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शिर्डीत आता लोखंडे विरोधात घोलप हे खासदारकीचे उमेद्वार असतील अशी चर्चा होवू लागलीय.