सासरे शिवाजी कर्डिलेंची गोची झालीय का? जावई संग्राम जगताप म्हणतात….

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

अहमदनगर: राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी करत आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप असा सामना आता नगरमध्ये रंगणार आहे. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. संग्राम जगताप […]

सासरे शिवाजी कर्डिलेंची गोची झालीय का? जावई संग्राम जगताप म्हणतात....
Follow us on

अहमदनगर: राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी करत आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप असा सामना आता नगरमध्ये रंगणार आहे. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. संग्राम जगताप यांचे सासरे आणि नगरमधील किंगमेकर राजकारणी म्हणून ओळख असलेले शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार आहेत.

आमदार संग्राम जगताप यांचं नाव जाहीर झाल्यानंतर नगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संग्राम जगताप यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यंदाच्या लोकसभा  निवडणुकीत गुलाल आमचाच, असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

गुलाल आमचाच

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असं आमदार संग्राम जगताप म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मला जबाबदारी आणि चांगली संधी दिली आहे. ही जबाबदारी निश्चितच पार पाडेन, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार नक्कीच निवडून येईल, असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

नगरची ही जागा पूर्वीपासून राष्ट्रवादीकडे होती. विविध उमेदवारांना पवारसाहेबांनी संधी दिली. मात्र काही कारणास्तव इथे अडचणी आल्या. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला नगर दक्षिणमध्ये चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे इथे विजयासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असं संग्राम जगताप यांनी नमूद केलं.

विखे घराण्यातील कोणी नगर दक्षिणमध्ये उभं राहिलेलं नाही, ते नगर उत्तरेमध्ये निवडणुका लढवतात. मला तिकडची परिस्थिती सांगता येणार नाही, पण नगर दक्षिणमध्ये यंदा राष्ट्रवादीचाच गुलाल असेल, असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

शिवाजी कर्डिलेंची गोची झालीय का?

याबाबत संग्राम जगताप म्हणाले, “शिवाजी कर्डिलेंचा पक्ष वेगळा आहे. त्यांची गोची होण्याचा प्रश्नच नाही कारण ते कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे त्यांची गोची म्हणणं योग्य नाही. नगरमध्ये राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला पाहिजे, चांगल्या विचाराचा खासदार निवडून आला पाहिजे, स्थानिक माणूस निवडून आला पाहिजे, हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यामुळे त्यांचा विषय (शिवाजी कर्डिलेंचा) इथे येतच नाही”.

VIDEO:

संबंधित बातम्या 

नगरमध्ये राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक, संग्राम जगतापांना उमेदवारी जाहीर  

नगरमध्ये शिवाजी कर्डिलेंची गोची, एकीकडे जावई, तर दुसरीकडे पक्षाचा उमेदवार   

भाजप नेतेही माझ्या संपर्कात, मुलाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अरुण जगतापांचा इशारा