ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी (TMC Standing Committee) शिवसेनेने (Shivsena) बिनविरोध झेंडा रोवला. स्थायीच्या सभापतीपदी संजय भोईर (Sanjay Bhoir), तर परिवहन समितीच्या सभापतीपदी विलास जोशी (Vilas Joshi) यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. या निवडीची औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे. (Sanjay Bhoir elected as Thane Municipal Corporation Standing Committee Speaker)
स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करायचे होते. शिवसेनेतर्फे आज संजय भोईर यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी तर परिवहन समिती सभापती पदासाठी विलास जोशी यांनी आपले अर्ज दाखल केले. या दोन्ही समित्यांमध्ये शिवसेनेचं बहुमत असल्यानं शिवसेनेतर्फे दिल्या जाणाऱ्या उमेदवारांची निवड निश्चित होती.
शिवसेनेशिवाय इतर कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे संजय भोईर यांच्या स्थायी समिती सभापतीपदी, तर विलास जोशी यांची परिवहन समिती सभापतीपदी बिनविरोध निवड होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अर्ज भरताना ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बिहारमध्ये आमची सत्ता नव्हती. नागरिकांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो, मतदारांचा कौल स्वीकारलाच पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
ठाणे मनपा स्थायी समिती सभापती पदाच्या तसेच परिवहन सभापती पदाच्या निवडणूकीकरता शिवसेना पक्षाचे अनुक्रमे उमेदवार संजय भोईर तसेच विलास जोशी यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यासमयी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर सौ.पल्लवी कदम, राष्ट्रवादी नगरसेवक व गटनेते नजीब मुल्ला उपस्थित होते. pic.twitter.com/I8p5m1fJ3P
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 11, 2020
याआधीही, मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेने झेंडा फडकवला आहे. मुंबई महापालिका शिक्षण समिती आणि स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला. शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशी, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव निवडून आले.
संबंधित बातम्या :
काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच
दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा
(Sanjay Bhoir elected as Thane Municipal Corporation Standing Committee Speaker)