मी काय पाकिस्तानातून हिंदी शिकून नाय आलोय… शिंदे गटाच्या नेत्याचे अजित पवारांना जशास तसे उत्तर

| Updated on: Sep 17, 2022 | 5:49 PM

अजित पवार त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले?  त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागले असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

मी काय पाकिस्तानातून हिंदी शिकून नाय आलोय... शिंदे गटाच्या नेत्याचे अजित पवारांना जशास तसे उत्तर
Follow us on

मुंबई : चून चून के मारेंगे या शब्दात शिंदे गटाचे संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना इशारा दिला होता. त्यांच्या टीकेला अजित पवारांनी( Ajit Pawar) आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मी काय पाकिस्तानातून हिंदी शिकून नाय आलोय… असं म्हणत अजित पवारांच्या टीकेला संजय गायवाड यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात त्यांचे वाचाळ वीर आहेत. ते एकनाथ शिंदे साहेबांबद्दल तसेच आमच्या 50 आमदारांबद्दल किंवा आमच्याबद्दल टीका करतात त्यांच्यावर आम्ही टाका केली होती. अजित पवार त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले?  त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागले असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

मला हिंदी बोलता येत नाही अशी टीका अजित पवारांनी केली होती. मी महाराष्ट्राच्या माती जन्माला आलेला मराठी रांगडा माणूस आहे. मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून आलो नाही, असा प्रतिउत्तर बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दिले आहे.

अजित पवारांनी गायकवाड यांच्या चून चून के मारेंगे या वक्तव्य यासंदर्भात संताप व्यक्त केला होता. त्यावर गायकवाड यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार

यांचेच आमदार गोळ्या उडवतात. यांना सत्तेची मस्ती, धुंदी आणि नशा आली आहे. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना हात पाय तोडण्याची शिकवण देत आहेत. काय बापाची ठेव आहे काय? बुलढण्याचे आमदार म्हणतात शिंदे विराधात बोललात तर चुन चुन कें मारेंगे. मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.

कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाहीत. एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल असे भाकित देखील अजित पवारांनी केले होते.

तुमच्यासारखे सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेलो नाही. आमच्या बापाने आम्हाला कष्ट करून थोडेफार शिकवलं आणि आम्ही विधानसभेत पोचलो असं संजय गायकवाड म्हणाले.