“मंगलप्रभात लोढांवर गुन्हा दाखल करा”, ठाकरेगट आक्रमक

| Updated on: Dec 01, 2022 | 12:55 PM

शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरेगट आक्रमक...

मंगलप्रभात लोढांवर गुन्हा दाखल करा, ठाकरेगट आक्रमक
Follow us on

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा ठाकरेगट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, शिवसैनिकांचा उद्रेक झाला तर महाराष्ट्रात अघटित घडेल”, असं संजय पवार (Sanjay Pawar) म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान चुकून होत नाही. तो मुद्दाम केला जातोय. तोच भाजपचा अजेंडा आहे. कोल्हापूरचे शिवसैनिक लोढांवर गुन्हा दाखल करण्याबाबत अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. शिवरायांचा वारंवार केला जाणारा अपमान आम्ही सहन करणार नाही. शिवसैनिकांचा उद्रेक झाला तर महाराष्ट्रात वाईट घडेल, असंही संजय पवारांनी म्हटलं आहे.

राज्यपालांची शिवरायांबाबतची विधानं पाहता त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे, असं संजय पवार म्हणालेत.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठोपाठ शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही एकनाथ शिंदेच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. त्यावरून वाद निर्माण झालाय.

उद्धव ठाकरे जे काही निर्णय घेतील ते महाराष्ट्राच्या आणि हिंदूंच्या हिताचे असतील. उद्धव ठाकरे यांचे निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे असतील गुजरातच्या नाही. आम्ही त्यांचा आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत. जो त्यांचा संकल्प असेल तो चांगल्यासाठी असेल अशी कामाला खात्री आहे. आम्ही आदेश पाळणारे आहोत, त्यांना प्रश्न विचारणारे नाहीत, असंही संजज पवार म्हणालेत.

अनेक लोकं विश्वासघात करून बाजूला गेलेत. सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा शिवसेना एकमेव पक्ष आहे. संकटाच्या वेळी उद्धव ठाकरे यांना कोण साथ देत असतील त्याचं स्वागतच आहे, असंही संजय पवार पवार म्हणालेत.