मुंबई : शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड(Sanjay Rathore) यांची साथ सोडणार आहे. मंत्रीपद गेल्यानंतरही बंजारा(Banjara Poharadevi ) समाजाचे महंत संजय राठोड यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले होते. आता याच महंतांनी संजय राठोडांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजाचे महंत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यासंदर्भात खुद्द महंत सुनील महाराज यांनी खुलासा करत शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
संजय राठोड यांना शिंदे सरकार मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना मुंबईला भेटायला गेलो असता त्यांनी 4 तास बसून वेळ दिला नाही असा आरोप महंतानी केला.
बंजारा समाजाच्या हितासाठी आणि पोहरादेवी संस्थान विकासासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे महंतांनी सांगीतले. यानंतर संजय राठोड आणि माझा कोणताच संबंध राहणार नसल्याचेही यावेळी सुनील महाराज यांनी सांगितले होते.
लोकशाही असल्याने कुणी कुठे जावे हा त्यांचा अधिकार आहे असं म्हणत महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना ठाकरे गट प्रवेशावर मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहेत, कोण कुठे जायचं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. यांना तसं वाटलं असेल म्हणून ते गेले असावेत.
समाज कुण्या एका गट अथवा पक्षाचा नसतो. बंजारा समाजाचे लोक अनेक पक्षात आहेत असेही संजय राठोड म्हणाले.