नवी दिल्ली : “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. ब्राह्मण असल्याने आपल्याला मराठा आरक्षणाच्या लढाईदरम्यान टार्गेट केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. (Sanjay Raut answers Devendra Fadnavis allegation over target for being Brahmin CM)
“महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही. महाराष्ट्राने मुस्लिम मुख्यमंत्री पाहिला आहे. अल्पसंख्याक मंत्री राज्यात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला” याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. संजय राऊतांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शेतकरी विधेयक आणि इतर विषयांवर दोघांची चर्चा झाल्याची माहिती आहे.
“अकाली दल एनडीएतच आहे, ते बाहेर पडले असे आपण म्हणू शकत नाही. त्यांनी फक्त शेतकरी विधेयकावरुन मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संवाद थांबल्याचा हा परिणाम आहे. संवाद राहिला असता तर शिवसेनेलाही मजबुरीने बाहेर पडावं लागलं नसतं, पण तो इतिहास झाला” असं राऊत म्हणाले.
“शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे मजबूत खांब होते. मात्र आता दुसरा खांबही डळमळीत झाला आहे. त्यामुळे एनडीए अस्तित्वात आहे हे मानायला तयार नाही” असेही ते म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा केला नाही. विरोधीपक्षांनी तो बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. पण देशाच्या प्रमुखांच्या बाबतीत असा नकारात्मक दिवस साजरा करणं हे बरं नाही. बेरोजगारांचा प्रश्न निश्चितच मोठा आहे, भविष्यातील ती सर्वात मोठी समस्या आहे, पण तो प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही.” असं संजय राऊत म्हणाले.
Maratha Reservation | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचे सरकारला 5 सल्ले@Dev_Fadnavis pic.twitter.com/Cju35dC33w
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 17, 2020
संबंधित बातम्या :
‘ब्राह्मण असल्याने टार्गेट’, मराठा आरक्षण लढाईदरम्यान फडणवीसांचा आरोप
(Sanjay Raut answers Devendra Fadnavis allegation over target for being Brahmin CM)