नवी दिल्ली: ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची (pakistan) फाळणी झाली. त्या युद्धनौकेचा तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या माणसाने लिलाव मांडला. त्यातून काही कोटी रुपये जमा केले. त्याचे पुरावे समोर आले आणि तुम्ही म्हणता पुरावे कुठाय? राऊत काहीही बोलतात असं म्हणता? अरे तुम्ही काय बोलता? काल त्यांचं विधान होतं नखं कापून शहीद होता येत नाही. तुम्ही काय Xपटलं. तुम्ही काय कापलं सांगा? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना केला. या देशासाठी तुमचं काय बलिदान आणि योगदान आहे? उलट ज्यांचं योगदान आहे, त्या बलिदानाचा लिलाव करता या महाराष्ट्रात? असा सवालही संजय राऊत यांनी फडणवीसांना केला. राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच थेट देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
कधी राम मंदिराच्या नावाने तर कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले. आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान आहे. त्याचा लिलाव करता आणि त्या भ्रष्ट गुन्हेगाराचाी बाजू घेता? तुम्ही नेहमी अभ्यास करून बोलता असा दावा करता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार झाला नाही? आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? तुमचंच राजभवन आहे. आमचे नाही. तिथे तुमचेच आदेश पाळले जातात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
सेव्ह विक्रांतच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभरात गाजणार. शिवसेनेने राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला. आज महाराष्ट्रात या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशद्रोहींना तुरुंगात टाकू. देशभक्तीचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवलं आहे. तुमचे मुखवटे गळून पडले आहेत. हे एक लहानसं प्रकरण आहे. अजून आणखी प्रकरण काढू. आयएनएस विक्रांत भंगारात जरी घालवली असली तरी हे फालतू पुढारी आणि त्यांचे पक्ष अरबी समु्रदात बुडवल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
‘INS विक्रांत’ हा सर्वात मोठा घोटाळा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊत आक्रमक
Maharashtra News Live Update : साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस