मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) जातील की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. तर योगींच्या मदतीने भाजप अधिक प्रभाव दाखवण्याचीही शक्यता व्यक्त होतेय. कर्नाटक सरकार ज्याप्रमाणे आरेरावी करतंय, त्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारही महाराष्ट्रापासून काय काय हिरावून घेईल ते पहा, असा इशारा दिला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच एक ट्विट केलंय. अयोध्येत आम्ही महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे..
आता शिंदे-फडणवीस सरकारनेही बेळगावात महाराषअट्र भवन उभारण्याची घोषणा करावी, गरज आहे, पहा जमतंय का… असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय.
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आधीच केली होती.तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे. आनंदच आहे.
शिंदे फडणविस सरकारने बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करावी.
गरज आहे.पहा जमतंय का.— Sanjay Raut (@rautsanjay61) January 6, 2023
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. योगी आदित्य नाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून बोलताना अरविंद सावंत म्हणाले, ‘ तुम्ही पहात रहा ? काय काय महाराष्ट्रातून जात आहे… हे सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी बसले.. गुजरातमध्ये उद्योग गेले… आता हे (योगी आदित्यनाथ) आले…
हे आणखी घेऊन जाणार… मुंबईचा खच्चीकरण केलं जातंय. कर्नाटकातला एक मंत्री म्हणतो की, मुंबई केंद्रशासित करा… याहून तुम्हाला कळते की ही काही अदृश्य पावला आहेत… मुंबई आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी हे सरकार साथ देते आणि हे दुर्दैव आहे, अशी खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.