मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Ram Mandir foundation program). राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला आहे. अयोध्येचा कार्यक्रम शासकीय आहे. उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पुढे गेलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राम मंदिराची निर्मिती होणार आहे. त्यामुळे राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला. अयोध्येचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे नक्कीच अयोध्येत जातील.”
LIVETV – शिवसेना खासदार संजय राऊत लाईव्ह –
बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पुढे गेलं, राम मंदिराचं भूमिपूजन आवश्यक, उद्धव ठाकरे नक्कीच अयोध्येत जातील https://t.co/ImprYhMJl7 @rautsanjay61 pic.twitter.com/J4fVNYqerc— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“राम मंदिराचा निर्णय आला तेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. शरद पवारांनी राम मंदिराविरोधात वक्तव्य केलं नाही. केवळ कोरोना नियंत्रणावर भर द्यायला हवं असं म्हटलं आहे. हे तिन विचारधारेचं सरकार आहे. त्यामुळे सर्व गोष्टींवर आम्ही सहमत असलोच पाहिजे असं नाही. तसं सहमत असायलाच हवं असं आघाडीच्या घटनेत कुठंही नाही. काही गोष्टींवर आमचे विचार वेगळे आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं काम आम्ही करत आहोत,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
“जनतेचं दिल आम्ही जिंकलं आहे, दोन नवे दोस्त आम्हाला मिळाले, आधीच्या दोस्तांनी पाठीत खंजीर खुपसला, कोरोना संकट काळात दुनियादारी करावीच लागते.”
“लालकृष्ण अडवाणींविरोधात बाबरीचा खटला चालवणं चुकीचं”
संजय राऊत म्हणाले, “राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट तयार केलं आहे. त्यात फार हस्तक्षेप व्हायला नको. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं होतं त्यामुळे त्यांना ट्रस्टवर निमंत्रित म्हणून घेणं आवश्यकच. अडवाणींसह अनेकांनी यात योगदान दिलं. राम मंदिराची निर्मिती सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयाने होत आहे. एकिकडे राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा करायचा आणि दुसरीकडे अडवाणींविरोधात बाबरीचा खटला चालायचा हे चुकीचं आहे.”
संबंधित व्हिडीओ:
शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर ‘त्या’ अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण
शरद पवारांचं विधान मोदींविरोधी नव्हे तर श्रीरामांविरोधात, पवार तर रामद्रोही : उमा भारती
Sanjay Raut on Ram Mandir foundation program