मुंबई: शिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somiaya), निल सोमय्या, मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी वाधवान याच्याशी निल सोमय्या याचा संबंध असल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांच्या ईओडबल्यूनं आणि आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागानं निकॉन इन्फ्रावर कारवाई करण्याबाबत विचारा करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी देखील पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. आज संजय राऊत यांनी बाप बेटे जेलमध्ये जाणार असं म्हणत सूचक ट्विट केलं आहे. तर, मोहित कंबोज यांनी सलीम जावेदची जोडी जेलमध्ये जाणार असा आरोप मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर केला आहे.
सलीम – जावेद दोनो जेल जाएँगे !
Wait and Watch ! https://t.co/iGYafIArfF— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 16, 2022
संजय राऊत यांनी बाप बेटे जेल मध्ये जाणार,वेट अँड वॉच, कोठडीचं सॅनिटायझेशन सुरु असं ट्विट केलं होतं. संजय राऊत यांच्या ट्विटला मोहित कंबोज यानं सलीम – जावेद ची जोडी जेलमध्ये जाणार, असं सूचक ट्विट केलं. गेले काही दिवस कंबोज यांच्याकडून संजय राऊत – नवाब मलिक यांच्यावर आरोप केले जातात. काल राऊत यांनी ही खंबोज यावर जोरदार आरोप केले होते.
Skeletons are tumbling out of closet.Self-Proclaimed Crusader Kirit Somaiya himself is alleged of blackmailing. Victims of Somaiya’s extortion racket are now speaking up.I appeal the #CBI & #anticorruptionBureau of Mah’tra govt to jointly investigate Kirit’s dirty extortion game.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
भ्रष्टाराचाराविरोधात लढणाऱ्या किरीट सोमय्यांची ब्लॅकमेलिंगची प्रकरण समोर येत आहेत. सोमय्यांच्या खंडणी वसुली प्रकरणातील पीडित लोक आता बोलायला लागली आहेत. सीबीआय आणि महाराष्ट्राच्या एसीबीनं किरीट सोमय्यांच्या खंडणी वसुलीची संयुक्त चौकशी करावी, असं संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या :