सोलापूर : संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, असं वक्तव्य करत महाविकास आघाडी सरकार स्थापनेचं संपूर्ण श्रेय काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांना दिलं. ठाकरे सरकारचे शिल्पकार शरद पवार यांना मानलं जातं. पण मंत्री विश्वजीत कदम यांनी मात्र संजय राऊत यांना सरकारच्या निर्मितीचं श्रेय दिलं.
मंत्री विश्वजीत कदम सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी सरकार निर्मितीच्या प्रक्रियेवर बोलताना त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली. संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून बरं झालं. त्यांच्या अंगात आल्यानेच महाराष्ट्राच्या इतिहासात जे झालं नाही ते घडलं, असं विश्वजीत कदम म्हणाले.
पुढे बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, “मी माझ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केलं तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असं मतदारांना सांगत होतो. कारण त्यावेळेस वातावरण असते होते. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि केंद्रात भाजपचे सरकार आलं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन महिन्यानंतर संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडीचे सरकार बनले”
महाविकास आघाडीच्या निर्मितीचं संपूर्ण श्रेय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले जातं. विविध पक्षांचे नेते निर्विवावदपणे शरद पवार यांचं श्रेय मान्य करतात. मात्र मंत्री विश्वजीत कदम यांनी थेटपणे पवारांना डावलून संजय राऊतांना सरकार निर्मितीचं सारं श्रेय देऊन टाकलं.
“युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला भरपूर प्रेम दिलं. विरोधी पक्षात असताना सांगली-कोल्हापुरात महापूर आला. झोकून देऊन जनतेसाठी काम केलं. त्याचं फळ म्हणून विधानसभेला मी 1 लाख 63 हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो. त्यावेळी मी माझ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केलं तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असं मतदारांना सांगत होतो. कारण त्यावेळेस वातावरण असते होते. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि केंद्रात भाजपचे सरकार आलं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोन महिन्यानंतर संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडीचे सरकार बनले”
(Sanjay Raut formed the Thackeray government says Maharashtra Minister Vishwajeet kadam)