मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच (Shivsena) शिवसेना नेते खा. संजय राऊत हे (ED) ‘ईडी’च्या रडावर आहेत.जमिन घोटाळा प्रकरणी त्यांना सोमवारीच ईडीने नोटीस बजावली होती. मात्र, राजकीय सभा आणि मेळाव्यांचे पुर्वनियोजन असल्याचे सांगत त्यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. शिवाय मंगळवारी ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले नाहीतर त्यांनी आपल्या वकिलाला पाठवले होते. मात्र, असे असताना ई़डीने आता त्यांना दुसरी (Notice) नोटीस बजावली आहे. शिवाय 1 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संजय राऊत आता या समन्सला कसे उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.
खा. संजय राऊत यांनी जमिन घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याअनुशंगाने भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर आरोप तर केले होतेच पण आता त्यांना प्रत्यक्ष चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. या प्रकरणी सोमवारीच राऊत यांना नोटीस बजावण्यात आली होती. पण सध्या राज्यातील राजकीय स्थिती पाहता आपले पुर्वनियोजित दौरे असल्याचे सांगत चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ते चौकशीला हजर राहिले नव्हते मात्र, त्यांचे वकील ईडी कार्यालयात दाखल झाले होते.
ईडी कडून पहिले समन्स राऊत यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्यक्रमाचे कारण पुढे करीत चौकशीला हजर राहता येणार नसल्याचे सांगितले होते. असे असताना देखील सलग दुसऱ्या दिवशीच त्यांना दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राऊत हे यातून मार्ग काढून सध्याच्या राजकीय घडामोडीत व्यस्त असले तरी त्यांना आता 1 जुलै रोजी हे चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. गोरेगाव येथील जमिन घोटाळाप्रकरणी त्यांना हे समन्स पाठविण्यात आले आहे.
राज्यातील राजकीय घडामोड ही तासागणिक बदलत आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेमुळे नेमके काय होणार याबाबत सर्वकाही अनभिज्ञ असताना दुसरीकडे ईडी संजय राऊतांची पाठ सोडायला तयार नाही. सोमवारीच त्यांना या जमिन घोटाळाप्रकरणी चौकशीला हजर राहण्याचे बजावण्यात आले होते. पण त्यांनी मुदतवाढ तर मागितलीच पण हे केंद्राचे षडयंत्र असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. पण आता दुसऱ्या समन्सनंतर ते काय निर्णय घेणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.