टेबलाखालून जे व्हायचं ते आता टेबलावरुन, संजय राऊत यांनी मनसेसह भाजपला कशावरून डिवचलं ?

| Updated on: Feb 15, 2023 | 11:51 AM

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

टेबलाखालून जे व्हायचं ते आता टेबलावरुन, संजय राऊत यांनी मनसेसह भाजपला कशावरून डिवचलं ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )  यांनी पुण्यात भाजपला मनसेने पाठिंबा ( MNS Supoort to BJP )  दिला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी यावेळी भाजपसह मनसेला चांगलाच टोला लगावला आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिला त्यामध्ये नवीन काही नाही. मनसे भाजप सोबतच आहे. टेबला खालून जे व्हायचं ते आता टेबला वरून होतंय एवढंच असं संजय राऊत यांनी म्हणत भाजपसह मनसेला टोला लगावला आहे. या युतीचा काहीही फरक महाविकास आघाडीला होईल असे वाटत नाही असाही दावा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील आमदारांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजपसह महाविकास आघाडीत प्रमुख लढत पाहायला मिळत आहे.

भाजपला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागून होते. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी याच युतीवर भाष्य करत मनसेला आणि भाजपला टोला लगावला आहे. टेबला खालून जे व्हायचं ते आता टेबला वरून होतंय एवढंच असं म्हणत मनसे पहिल्यापासूनच भाजप सोबत असल्याचा दावा केला आहे.

याशिवाय संजय राऊत यांनी पुण्यात महाविकास आघाडीची परीक्षा असल्याचे म्हंटले आहे. त्यामध्ये आम्ही पास होऊ म्हणत महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

पुण्यातील निवडणुकीत भाजपाची वाताहत झालेली दिसेल असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. जे विधान परिषद निवडणुकीत झालं, तेच पोटनिवडणुकीत होणार असल्याचा दावा सुद्धा राऊत यांनी केला आहे.

महाविकास आघाडी मजबूत आहे आणि एकदिलाने ती काम करत आहे, पुण्यात महाविकास आघाडीची परीक्षा आहे. ती परीक्षा महाविकास आघाडी पूर्ण मार्काने पास होईल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. उद्याच्या दोन्ही पोटनिवडणुकीत तो संताप दिसेल, अंधेरीत शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. भारतीय जनता पक्षाने मतदारांना कायम गृहीत धरले अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या मतदारांना आता तुम्ही गृहीत धरले ते आता ते शक्य नाही, सामान्य माणूस भाजपा वर नाराज आहे त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे.