मुंबई : राज्याच्या राजकारणात एकिकडे संजय राऊतांची (Sanjay Raut) अटक गाजतेय. तर दुसरीकडे प्रादेशिक पक्षांबाबतचं भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांचं वक्तव्य गाजतंय. परिवार पक्ष संपत आले आहेत, या जे.पी नड्डा यांच्या वक्तव्यावर आता संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी संतप्त सवाल केला आहे. तसेच त्यांनी धाडीची हकीकतही सांगितली आहे. शिवसेना (Shivsena) संपेल असे सांगेल पक्ष संपणार असे विधान त्यांनी केलं आहे. तसेच हे सांगायला जे. पी. नड्डा काय देशाचे गॉडफादर आहेत का? असाही सवाल केला आहे. त्यांनी आमदार पळवले म्हणून शिवसेना संपत नाही, ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहेत .तोपर्यंत शिवसेना संपणार नाही . जे गेले ed ला घाबरून गेले, त्यांना लवकरच पश्चाताप होईल . असे सूचक विधानही त्यांनी केलं आहे. तसेच ते काल कोश्यारी काय बोलले त्याचा कोणी निषेध केला का ? भाजपच्या ताटाखाली बसलेले मांजरं आहेत ती, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
तर एकनाथ शिंदे म्हणतात भोंगा बंद झाला. मात्र याच भोंगाच्या जीवावर शिंदे हे नगर विकास मंत्री होते. भोंगा बंद झाला असता तर तुम्ही घरी बसला असतात, असा पलटावरही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. सामनाचा अग्रलेख आणि सामनाचा संपादकीय गेल्या अनेक तीस वर्षापासून सुरू आहे. तसाच खणखणीत निघेल, असेही त्यांनी बजावलं आहे.
तसेच उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत कुटुंबप्रमुख आहेत. आमचे प्रमुख म्हणून ते घरी आले. माझ्या 84 वयाच्या आईला दिलासा दिला. पक्षासाठी, संघटनेसाठी आज ईडीच्या जेलमध्ये संजय राऊत आहेत. त्यामुळे आज घरी ते दिलासा देण्यासाठी आले ते गरजेचं होतं. सर्व कुटुंबीयांशी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असा मोठा दिलासा उद्धव ठाकरे यांनी दिला, असेही त्यांनी सांगितलं.
20 ते 22 ed चे अधिकारी घरी आले होते .सर्व घर सर्च करून काही डॉक्युमेंट्स घेतले . तेच डॉक्युमेंट त्यांच्याकडे देखील अगोदर पासून होते .सर्व ड्रामा बाजी आहे संजय राऊत यांचा आवाज बंद होणे शक्य नाही. आज इडीने खोटी डॉक्युमेंट्स सादर केले .संजय राऊत हा बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत आहे. त्यांनी शिवसेनेचे प्रेम कमवलं आहे, अख्या महाराष्ट्र मध्ये एक अंगार होता, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.