मुंबई – मागील अनेक दिवसांपासून संजय राऊत (sanjay raut) आणि किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. प्रत्येकवेळी दोन्ही राजकारणी एकमेकांवरती आरोप करण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठा घोटाळा केल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले होते.ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवणार असल्याचं देखील किरीट सोमय्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने आएनएस विक्रांतच्या नावाखाली जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मागच्या वीस दिवसापुर्वी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीने शंभर कोटीचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत हातात एकही कागद नसताना आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी कारण त्यांनी मेधा सोमय्या (Medha somaiya) यांचे चरित्रहनन केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा प्रवक्ता असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.
संजय राऊत यांना मेधा सोमय्यांच्या वतीने रितसर नोटीस देण्यात येणार आहे. संजय राऊतांनी घोटाळा केल्याचा एकही पुरावा सादर केलेला नाही. मेधा सोमय्या यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी वीस दिवसांपुर्वी आरोप केला होता. 35 वर्ष माझी पत्नी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करीत आहे. टाटा इंस्टिट्युट ऑफ सोशल सायन्स हा विषय शिकवत आहे. मागील वीस दिवसांपासून माझ्या पत्नीची बदनामी सुरू आहे. चोवीस तासाच्या आता माफी मागावी अन्यथा, कारवाई करणार असल्याचे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले आहे. मेधा माझी पत्नी आहे. कुटुंबियांना तुरूंगात टाकण्याची भाषा राऊत यांनी वापरली आहे. नील सोमय्या आणि राकेश वाधवान पार्टनर आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत डरपोक, ऊद्धव ठाकरे महाडरपोक आहेत. इडीचे चार अधिकारी आणि किरीट सोमय्या हजारो कोटींची वसूली केली आहे. एका पाठोपाठ एक असे अनेक आरोप माझ्यावरती केले आहेत. आत्ता त्यांना धडा शिकवण्यासाठी डिफमेशनची नोटीस पाठवली आहे असं किरीट सोमय्यांनी सांगितलं. त्याचबरोबर बिकेसीत छाब्रिया यांचं ऑफिस, आणि बीकेसीतून बांद्रा इथे कुणाच्या खात्यात पैसे गेले याचीही चौकशी होणार आहे. हे मी जबाबदारीने बोलतोय असंही किरीट सोमय्या स्पष्ट सांगितलं आहे. चोरीचा माल कुणाला मिळाला. लाभार्थी कोण याचा सीबीआय शोध घेणार आहेत. बीकेसी दहा बिल्डींगमध्ये कुणाचे फ्लॅट्स आहेत हे सुध्दा लवकरचं कळेल.