मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. “साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी,प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी!”, असं म्हणत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा जुना फोटो त्यांनी शेअर केलाय.
साहेब…
जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/qK0ZufV9is— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है… साहेब… विनम्र अभिवादन ! जय महाराष्ट्र!, असं ट्विट करत संजय राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
हे नाते खुप जुने आहे.
ये रिश्ता बहोत पुराना है..
साहेब..
विनम्र अभिवादन !
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/vDhofuiVbi— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना संजय राऊत यांची महत्वाची भूमिका राहिली. त्यांनी सातत्याने शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली. पण पुढे काहीच दिवसात त्यांच्यावर आरोप करत शिंदेगटाने बंड केलं. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आलं. त्यानंतर कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना अटक झाली. शिवसेनेत झालेल्या या सगळ्या बदलांनंतर आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन साजरा होतोय. त्यानिमित्त राऊतांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत.
आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलंय. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी! pic.twitter.com/FjOVbif7KR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 17, 2022
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/N8qUPEPHfM
— Supriya Sule (@supriya_sule) November 17, 2022