मुख्यमंत्री शिंदे, जराजरी नैतिकता उरली असेल तर राजीनामा द्या-संजय राऊत

| Updated on: Nov 20, 2022 | 11:34 AM

जराजरी नैतिकता उरली असेल तर राजीनामा द्या, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार शाब्दिक हल्ला केलाय.

मुख्यमंत्री शिंदे, जराजरी नैतिकता उरली असेल तर राजीनामा द्या-संजय राऊत
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) करतात. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी शिवरायांचा अतिशय वाईट शब्दात शिवरायांचा अपमान केला तरी तुम्ही शांत का? शिवरायांचा अपमान तुम्ही शांतपणे सहन कसा काय करू शकता? एकनाथ शिंदेजी (Cm Eknath Shinde), जराजरी नैतिकता उरली असेल तर राजीनामा द्या, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार शाब्दिक हल्ला केलाय.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे, असं आव्हानही राऊतांनी दिलंय.

छत्रपतींबाबत राज्यपाल कोश्यारींनी पुन्हा एकदा दळभद्री विधान केलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावलाय. तुम्ही शांत कसे?, असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारलाय.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली, असं म्हणत सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अपमान केला. त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत बसता. सतत स्वाभिमानाची भाषा बोलणारे शिंदे आता गप्प का? शिवरायांचा अपमान तुम्ही सहन कसा काय करू शकता?, असं राऊत म्हणालेत.

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?

“औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवा. नाहीतर जोडे काय असतात? आणि ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत म्हणावलेत.

कोश्यारी यांचं वादग्रस्त विधान

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.