“शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक ‘या’साठी भाजपमध्ये जाणार”, संजय राऊत यांनी 2 मोठी कारणं सांगितली…

| Updated on: Jan 02, 2023 | 11:01 AM

संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि शिंदेगटावर टीका केली आहे. काय म्हणालेत. पाहा...

शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक यासाठी भाजपमध्ये जाणार, संजय राऊत यांनी 2 मोठी कारणं सांगितली...
Follow us on

मुंबई : “शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही. शिंदेगटही (CM Eknath Shinde) टिकणार नाही. शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक स्वत:ला भाजपमध्ये विलिन करून घेतील. हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे”, असं शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि शिंदेगटावर टीका केली आहे.

राऊतांनी दोन कारणं सांगितली…

शिंदेगटातील नेत्यांना शिवसेना स्विकारणार नाही आणि दुसरा त्यांच्याकडे कोणता पर्याय नाही. त्यामुळे शिंदेगटातील नेते भाजपत जाणार, असं राऊत म्हणालेत.

दीपक केसरकर यांनी जुळवून घेण्याची भाषा शिंदेगटात सध्या काय चाललं आहे, याची कल्पना येते. शिंदेगटात टोळी युद्ध सुरु आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी एवढे नेते शिवसेनेतून बाहेर का पडले याचं आत्मपरिक्षण करावं.जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं दीपक केसरकर यांनी काल शिर्डीत बोलताना म्हटलं. त्याला आता राऊतांनी उत्तर दिलं आहे.

आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरे शिवसेना आहे.आत्मपरीक्षण जर गद्दार आम्हाला करायला सांगत असतील तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे, जे गद्दार आहे जे सोडून गेलेले आहेत त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत आणायचं नाही, असं राऊत म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाही वाढत आहे. दीपक केसरकर यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं त्यानंतर हे विधान बाहेर येत आहे. त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झालेले आहे आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे, असं राऊत म्हणालेत.

भारत जोडो यात्रा ही एक यशस्वी यात्रा आहे. पुन्हा एकदा देशाला एकतेचा संदेश देणारी यात्रा आहे. जर कोणी देश जोडण्याचा बोलत असेल तर पूर्ण देश त्याच्यासोबतच जाईल. राहुल गांधी यांच्या पाठिशी जनता आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे, असं राऊत म्हणालेत.