मुख्यमंत्री बोलताना गल्लीतलं भाषण ऐकल्यासारखं वाटतं!, संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंच्या भाषणाची खिल्ली

| Updated on: Jan 02, 2023 | 12:15 PM

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणालेत. पाहा...

मुख्यमंत्री बोलताना गल्लीतलं भाषण ऐकल्यासारखं वाटतं!, संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंच्या भाषणाची खिल्ली
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं तर ते एखादं गल्लीतलं भाषण वाटतं”, अशा शब्दात राऊतांनी शिंदेंच्या भाषणावर टीका केली आहे. शिंदेगटात नाराजीचा सूर असल्याचंही राऊत (Sanjay raut) म्हणाले आहेत.

नुकतंच विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

विधानसभेतील संबोधन हे मुख्यमंत्र्यांचं वैयक्तिक भाषण नाहीये. मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राचा विकासवरती बोलण्यासाठी. तिथे राज्यातील प्रश्नांवर विकासावरच बोलणं अपेक्षित आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळते. पण मुख्यमंत्रीच जर वैयक्तिक मुद्द्यांवर भाषण द्यायला लागले तर राज्याच्या विकासाला कोण बोलणार?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.

मुख्यमंत्र्यांना संधी मिळाली परंतु ती बेकायदेशीर पद्धतीने मिळालेले आहेत. त्यांना संधी मिळालेली आहे. त्यांनी खूप संयमाने काम केलं पाहीजे, असं राऊत म्हणालेत.

रस्त्यावरची भाषा असली तर आम्हीही रस्त्यावरती उत्तर देऊ. आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय, मंत्री म्हणून बोलताय भान ठेवून बोललं पाहिजे, असं म्हणत राऊत यांनी शिंदेंच्या भाषणावर टीका केली आहे.

शिंदेगटातील निम्म्याहून जास्त लोक स्वत:ला भाजपमध्ये विलिन करून घेतील. हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे शिंदेगटातील नेत्यांना शिवसेना स्विकारणार नाही आणि दुसरा त्यांच्याकडे कोणता पर्याय नाही. त्यामुळे शिंदेगटातील नेते भाजपत जाणारच, असंही राऊत म्हणालेत.

दीपक केसरकर यांच्या कालच्या विधानावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाही वाढत आहे. दीपक केसरकर यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं त्यानंतर हे विधान बाहेर येत आहे. त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झालेले आहे आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे, असं राऊत म्हणालेत.

महाराष्ट्रात जर भाजपाचे 145 मिशन होत असेल तर शिंदे गट कुठे आहे. मग शिंदे गटातील लोक काय धुणी भांडी करायला ठेवणार का? भारतीय जनता पार्टीच्या पायरीवर देखील यांना कोणी उभा करत नाही तात्पुरती तडजोड आहे, असंही राऊत म्हणालेत.

भारत जोडो यात्रा ही एक यशस्वी यात्रा आहे. पुन्हा एकदा देशाला एकतेचा संदेश देणारी यात्रा आहे. जर कोणी देश जोडण्याचा बोलत असेल तर पूर्ण देश त्याच्यासोबतच जाईल. राहुल गांधी यांच्या पाठिशी जनता आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे, असं राऊत म्हणालेत.