मुंबई : शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणखीच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शहाजी पाटील या तिघांवर निशाणा साधला आहे. ‘बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!”,असं ट्विट राऊतांनी केलं आहे.
बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा.
डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका.
आपण यांना ओळखता ना?
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/8yb33kHFOc हे सुद्धा वाचा— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी गुलाबराव पाटलांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात गुलाबराव पाटील आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. पक्ष बदलणाऱ्यांवर बरत आहेत. त्यांचा हाच व्हीडिओ शेअर करत राऊतांनी बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा… असं म्हटलंय.
याच ट्विटमध्ये राऊतांनी दीपक केसरकर यांना संयमी राहण्याचा सल्ला दिलाय. श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा, असं राऊत म्हणाले आहेत.
सांगोल्याचं आमदार शहाजी पाटील हे सध्या शिंदे गटासोबत गुवाहाटीला आहेत. तिथून त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्णन केलं. काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल असं पाटील म्हणाले. त्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यावर राऊत बोललेत. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका, असा सल्ला त्यांनी पाटलांना दिलाय.
महाराष्ट्रातील राजकीय राडा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय. त्याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे.