शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात (Shiv sena Bhavan, Dadar) आज (मंगळवार 15 फेब्रुवारी, 2022) पत्रकार परिषद घेणार आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष शिवसेनेच्या आजच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेकडे (Press conference of Sanjay Raut) लागलं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत हे महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट करण्याची शक्यताय. मोठ्या संख्येनं शिवसेनेचे कार्यकर्ते हे शिवसेना भवनाच्या दिशेनं निघालेत. दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पुढची पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता शिवसेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेतून काय खळबळजनक खुलासे केले जातात, याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची नजर लागली आहे. भाजपचे (Bhartiya Janata Party) साडे तीन लोक तुरुंगात जातील असा आरोप संजय राऊतांनी केला होता.आता ते साडेतीन लोक कोण आहे, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचंही राऊतांनी म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेसह राजकीय घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार असून, जाणून घेऊयात यांच संदर्भातले ताजे आणि वेगवान अपडेट्स
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची
उद्या बुधवार दि. 16 फेब्रुवारी रोजी
सांध्यकाळी 4.00 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
गेले २-३ दिवस मोठी गोष्ट बाहेर काढणार असल्याचा कांगावा यांनी केला. जगात आजपर्यँत कोणाची पत्रकार परिषद झालीच नाही, यांचीच पहिल्यांदा होत आहे, असे हे वागत होते. या सर्वातून शेवटी ‘खोदा पहाड निकला चुहा’ असं सिद्ध झालं. इतरांविषयी बोलताना अपशब्दांचा वापर करणं ही यांची संस्कृतीच आहे. pic.twitter.com/wozD7lAIjI
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 15, 2022
आम्हीही झुकणार नाही
संजय राऊतांना कंबोज यांचे खुले आव्हान
संजय राऊतांचे स्मग्लरशी संबंध काय? हे मी येणाऱ्या काळात सांगेल
मी त्यांचे कॉल रेकॉर्डींग देणार आगामी काळात
संजय राऊत माझ्या घरी आलेले फोटो बघा
मोहीत कंबोज यांनी फोटो दाखवले
आज मुंबईत एवढी मोठी कारवाई झाली, त्यावर तुम्ही का गप्प बसले?
ही जुगलबंदी जोडी कोण आहे, त्यांच्याशी तुमचा संबंध काय आहे?
संजय राऊतांची आरोप खोटे, नवाब मलिकांसारखे हे उघडे पडले आहेत
पाटकरबरोबर संजय राऊतांचा संबंध यावरही उत्तर द्या
संजय राऊत आज लोकांसमोर एक्स्पोज झाले आहेत
मी संजय राऊत यांना लीगल नोटीस पाठवणार
ही सलीम जावेदची जोडी देशात एक्स्पोज झाली आहे
कंगनाचे घर तोडण्याचे काम तुम्ही केले
नारायण राणेंवर खोटी केस तुम्ही केली
नितेश राणेंवर इगोसाठी केस केली
रवी राणा यांच्यावरही खोटे आरोप तुम्ही केले
प्रवीण राऊतांनी सत्तेचा दुरूपयोग करून 175 एकर जमीन एका बिल्डरला विकली
हा पाच हजार कोटींचा प्रोजेक्ट आहे
यात प्रवीण राऊत यांना साडेसातशे कोटी मिळाले
त्यात संजय राऊतांना किती कट मिळाला?
संजय राऊत आणि ग्रॅन्ड हयात हॉटेलचा काय संबंध आहे?
संजय राऊत यांचा स्मग्लर लोकांशी काय संबंध आहे?
यात संजय राऊतांना किती कोटी मिळतात?
मोहीत कंबोज यांच्याकडून सवालांची सरबत्ती
प्रवीण राऊतांबरोबर मिळून संजय राऊतांनी स्कॅम केला
माझेच त्या स्कॅमध्ये नुकसान झाले आहे
फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन खोटे आरोप करू नका
माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, पूर्ण प्रकरणाची चौकशी करा
जमीन स्वस्त घेतली सांगता
एवढी जमीन तर आहे का? मुंबईत
बारामतीची वनस्पती खाऊन बोलत होता का?
मी राकेश वाधवान याच्यावर केलेला एफआयआर आहे
मी फडणवीसांशी प्रामाणिक आहे
पण तुम्ही पवारांशी प्रमाणिक आहे की उद्धव ठाकरेंशी?
आज तुमच्याबरोबर एकही सत्तेतला माणून नव्हता
आजचा तुमचा शो फ्लॉप होता
तुम्ही आरोप केले तर तुम्हाला आधी अभ्यासाची गरज
2017 ला दरवर्षी संजय राऊत माझ्या घरी आले
दरवर्षी ते माझ्या घरी गणपतीला येतात
मग ओळखत नाही, तर गजनी झाले का?
राऊतांनी अनेकदा माझ्याकडून पैसे घेतले
सलीम जावेदमधील जोडीतल्या जावेदने प्रेस कॉन्फरन्स घेतली
राऊत मोठ्या नेत्यांबाबत बोलतात
माझ्यासारख्या सदोतीस वर्षाच्या मुलाशी सरकार लढत आहे
मला अनेक खोट्या केसमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला
खोट्या स्टोरी घेऊन बाजारात येतात
फडणवीस दिल्लील जाण्याची शक्यता
चंद्रकांत पाटील आधीच गेलेत
चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!!
चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !!
याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2022
All Media Are Invited For #PressConference At My Residence Khushi Belmondo Santacruz At 6.15 Pm today For All Answers !
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 15, 2022
एकादा माणूस अडचणीत आल्यास त्याचा थयथयाट होतो
तुमच्या मुलीच्या लग्नाची चौकशी होते, तर कायतर दोष असेल
काही दोष नसेल तर न्यायलय ईडीला विचारणा करेल
गेले दोन दिवस दवंडी पिटत होते
राऊतांच्या गळ्याशी आरोप आल्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांना वाकवून यंत्रणा राऊतांनी राबवली
खोदा पाहड आणि निकला चुहा
आशा आरोपांनी काय होत नाही
पुरावे आहेत, तर एजन्सीकडे जा
त्यांनी नाही ऐकलं तर कोर्टाकडे जा
आम्ही कोर्टाच्या निर्णयांमुळेच टीकलो आहोत
मी चाणाक्य आहे असा अभास संजय राऊतांना झाला आहे
राऊतांच्या ईडी मागे लागली हे मला माहीत नाही
राज्य सरकारने माझ्या मुलीच्या लग्नातील खर्चाची चौकशी केली आहे
आपल्यावर आरोप झाले म्हणून माझ्यावर आरोप करू नये
संजय राऊत नऊ कोटींचं नाही तर नऊ लाखांचं कार्पेट म्हणाले
शिवसेनेचे कॅबिनेटमध्ये मंत्री होते
त्यांना त्यावेळी कळलं नाही का? शिवसेनेचे मंत्री जागरूक होते
राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार-दरेकर
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत काहीही निघालं नाही,
संजय राऊतांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल-फडणवीस
छातूरमातूर गोष्टी करून काय होणार नाही-दरेकर
पुरावे द्या आणि सोमय्यांना जेलमध्ये टाका
राऊतांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही
सत्तेतल्या पक्षाने मागणी करायची नसते
एकतर सरकार तुमचं ऐकत नाही
उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल
जसजसे आत घुसू तसतसे भाजपला कळत जाईल
देवेंद्र फडणवीसांचा आणकी एक फ्रंट मॅन आहे मोहीत कंबोज नावाच
फडणवीस तुम्हाला बुडवणार आहे
पत्राचाळमध्ये मोहीत कंबोज याचा प्रोजेक्ट सुरू आहे
आणि आमच्यावर भष्टाचाराचे आरोप करतोय
या प्रोजेक्टमध्ये पीएमसी घोटाळ्याचे पैसे लागले आहेत
फडणवीसांचा ब्लू एन्ड बॉय आहे, याकडे एवढा पैसा कठून आला, हे फक्त फडणवीसांनाच माहीत आहे
कितीही धमकावा महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार
2024 मध्ये परिवर्तन होणार
हा फक्त ट्रेलर आहे
येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येणार
दिल्लीत जावा नायतर कुठेही जावा तुम्ही वाचणार नाही
राऊतांनी भाजपला ठणकावलं
अमित शाह, मोदींना माझा सवाल आहे, हीच तुमची लोकशाही आहे का?
माझ्या जवळच्या लोकांवर रेड सुरू झाल्यावर मी अमित शाह यांना फोन केला
त्यांना सांगितलं माझ्याशी दुष्मनी असेल तर मला पकडा
माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ नका
महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न
पण मला जेलमध्ये टाकण्यासारखी जेल अजून बनली नाही
अलिबागमदून 80 वर्षाच्या वृद्धाला उचलून नेलं
ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथेच तू मरणार म्हणून धमकावलं
ईडीची लोकं कुठं बसतात, कुठं खातात, कुठं पितात, सगळं तुम्हाला सांगू शकतो,
सगळ्यांची माहिती आहे..
दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, पीएमसची तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत.. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता… सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो..
ईडी भ्रष्ट आहे, हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावाय
ईडी आणि सीबीआय, ईओडब्लू, पंतप्रधान, गृहमंत्री मला ऐकत आहेत
मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी किसकी है?
किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत
किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे
पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि जमीन घेतली दुसऱ्याच्या नावावर
वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली
मी पळपुटा नाही, मी माझ्या मित्रांना टाळणार नाही
माझ्या मित्रांना मुद्दाम फ्रेम केले
पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख
राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले
राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर
भाजपच्या काळात पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाला
कोण आहे अमोल काळे ?
पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्या हातात आहे
ते ईडीला देणार
आमची गुंठ्यातली जमीन मोजली, आमचे नसणारे बंगले दाखवले
आता भाजपला मीही दाखवतो
ईडीने चुकीच्या माणसांशी पंगा घेतला आहे
ईडीने शिवसेना आणि महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे
ईडीची टक्कर शिवसेनेशी आहे
हरयाणातला दूधवाला नरवरला ईडी ओळखते का?
नरवर 7 हजार कोटींचा मालक कसा झाला?
महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरात त्याचं येणं जाणं होतं
भाजपच्या मनी लॉन्ड्रीगच्या केसेस लवकरच देणार
साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेले
भाजपच्या काळातल्या भ्रष्टाचारातून गेले
भाजपच्या वनमंत्र्यांच्या मुलीचे लग्न ईडीला दिसले नाही का?
माझं खुलं आव्हान आहे ईडीला, तुम्ही मला जेलमध्ये टाकून दाखवा
मात्र माझ्याबरोबर भाजपवालेही जेलमध्ये असतील
मी जिथे कपडे शिवून घेतले तिशेही ईडीवाले गेले
आता फक्त बुटवाल्याकडे जाण्याचे बाकी आहेत
लोकांना तिहारच्या जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या
माझ्या मुलीच्या लग्नाच्या हिशोबाला लागले आहेत
फुलवाले, पताकावाले, मेहंदीवेल्याडे पण ईडीवाले गेले
मी कधीही चुकीचे काम केलं नाही
ईडीच्या लोकांनी सकाळी माझ्या बँकेची स्टेटमेंट नेली
ईडीच्या लोकांनी माझ्या 50 गुंठे जमिनीची चौकशी केली
पाहटे चार वाजता ईडीने घरातून लोक उचलले
माझ्या विरोधात खोट्या साक्ष लिहून देण्यास जबरदस्ती केली
त्यांना अनेक तास डांबून ठेवलं
पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे घेतली हे दाखवावं
बाराव्या माणसाकडून पाटणकरांनी जमीन घेतली
राऊतांनी पूर्ण यादी वाचली
पाटणकर आणि देवस्थानाचा काही संबंध नाही
आम्ही देवस्थानाकडून जमीनी खरेदी केल्या नाहीत
मराठी माणसाविषयी भाजपला द्वेष
किरीट सोमय्यांनी काही वर्षापूर्वी मराठी भाषा सक्तीची नसावी असं अपील केलं होतं
आणि मुंबईत भाजप मराठी कट्टा चालवते
हाच तो, भडवा, दलाल, कोर्टात जातो आधी याचं थोबाड बंद करा
किरीट सोमय्यांचा भडवा, दलाल म्हणून उल्लेख
माझं आव्हान आहे त्या दलालाला, आपण चार बसेस करून पिकनीकला जाऊ
जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन
आणि जर बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारू
कुठे आहेत एकोणवीस बंगले?
आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेणार होतो
मात्र सुरूवात इथे शेवट ईडीच्या कार्यालयापुढे करू
इतके घाणेरडे राजकारण कधी झालं नाही
महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे
आम्ही मागे हटणार नाही
वडिलांना अटक करू अशा मुलांना धमक्या दिल्या गेल्या
असे राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही
गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ले झाले
मुख्यमंत्र्यांनी मला लोकांसमोर सत्य मांडण्यास सांगितलं
सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्रास दिल्यास आम्ही झुकणार नाही
आम्हाला बाळासाहेबांनी झुकायला शिकवलं नाही
काहीही करा हे सरकार पडणार नाही
हे सांगितल्यापासून माझ्या आजुबाजुच्या लोकांना अडकवण्याचा प्रयत्न झाला
माझ्यावरील सर्व आरोप खोटे,
मराठी माणसाने धंदा करू नये असे यांना वाटते
मी नकार दिल्यानंतर पवारांवरील धाडीबाबत सांगितलं
त्यानंतर पवारांच्या कुटुंबियांवर धाडी पडू लागल्या
ईडीचे लोक तिथे ठाण मांडून बसले
याच धमक्या त्यांनाही दिल्या
केंद्रीय पोलीस आणून थंड पाडण्याची धमकी
हे बोलल्यानंतर माझ्यावर आणि माझ्या लोकांवर तीन दिवसांत धाडी सुरू
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रमुख लोक मला भेटले
त्यांनी मला सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडण्यास सांगितले
आमची संपूर्ण तयारी झाली आहे
राष्ट्रपती राजवट आणू, अन्यथा आमदार फोड, पण सरकार आणू
असे भाजप नेते म्हणाले
तुम्ही आम्हाला मदत केली नाही, तर तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील, फिक्स करतील
याची सर्व सेटिंग दिल्लीत झाली आहे, तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, अशा धमकी दिल्या
महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे
सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत आहे
एकशे सत्तरचे बहुमत असताना भाजप कुणाच्या भरोशावर तारखा देत आहे?
उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे, ते सर्व त्या पत्रात आहे
माझ्यासारख्या लोकांना त्रास दिला जातोय
महाराष्ट्र गांडूची औलाद नाही
आम्ही घाबरणार नाही
कितीही वार केले तरी आम्ही थांबणार नाही
अनेक आमच्या नेत्यांना त्रास दिला गेला
राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना त्रास दिला गेला
केंद्रीय तपास यंत्रणेचे आमच्यावर हल्ले
हे देशावरचे संकट आहे
असेच सरकार पश्चिम बंगालमध्येही आलं आहे
बाळासाहेब सांगायचे कुणाच्या बापाला घाबरू नका
गुन्हा केला नसेल तर निडर रहा
मुख्यमंत्री हीच सेना पुढे नेत आहेत
संपूर्ण शिवसेना इकडे उपस्थित आहे
राऊतांनी जुन्या सहकाऱ्यांची नावं घेतली
मुख्यमंत्र्यांना माझा शिवसेना भवनातून नमस्कार
आता मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन आलेला
मुख्यमंत्री वर्षावरून पत्रकार परिषद पाहत आहे
सर्वांनी मला आशिर्वाद दिले
महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमक सुरू आहे
त्याविरोधत कोणीतरी रणशिंग फुंकायला हवे होते
ते आम्ही इथून फुंकत आहोत
जय महाराष्ट्र, करून पत्रकार परिषदेला सुरूवात
मला वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे-राऊत
बाळासाहेब ठाकरे यांना राऊतांचं अभिवादन
या वास्तूला एक महत्व आहे
अनेक लढे आम्ही याच वास्तू मधून लढलो
अनेक हल्ले पचवले
नुसते हल्ले नाही, अतिरेकी हल्ले पचवले
या वास्तूखाली बॉम्बस्फोट झाले
संजय राऊत पत्रकार परिषदेत बसले
आता कुणाची पोलखोल होणार?
बोलण्याआधी राऊतांनी फाईली कुठे आहेत विचारलं?
राऊतांचा सहकाऱ्यांना सवाल
राऊतांनी सर्व फाईली मागवून घेतल्या
राऊतांच्या फाईलींमध्ये कोणते मोठे गुपीत?
पत्रकार परिषदेआधी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण
आनंदराव अडसूळ, दिवाकर रावतेही पुष्पहार अर्पण करण्यास उपस्थित
शिवसेनेचे नेते संजय राऊतांच्या सोबत
मुंबईच्या महापौरही राऊतांच्या सोबत
खासदार विनायक राऊत पत्रकार परिषदेत संजय राऊतांसोबत
खासदार अरविंद सावंत
खासदार विनायक राऊत
कामगार नेते, शिवसेना उपनेते सचिन अहिर
खासदार अनिल देसाई
आमदार मनीषा कायंदे
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के
आमदार रवींद्र फाटक
आमदार सदा सरवणकर
मंत्री उदय सामंत
शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित
संजय राऊत एकटे पडले म्हणून भाजपचे नेते सांगत होते
मात्र संजय राऊत एकटे नाहीत हे भाजपला दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेते, आमदार, खासदार, मंत्री उपस्थित
भाजप चिरीमिरी आहे,
कुठे फाडून फेकून देऊ कळणार नाही,
मुंबईत शिवसैनिकांचा एल्गार
बाप हा बाप असतो, भाजपच्या डिवचण्याचा फरक नाही पडत
शिवसेना खासदार संंजय राऊतांचं कार्यकर्त्यांना हात उंचावून प्रतिसाद, सेना भवनात राऊत दाखल होताच एकच जल्लोष
शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात दाखल @rautsanjay61 @ShivSena थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात pic.twitter.com/lnTqPEXdoP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2022
काही मिनिटात संजय राऊतांची पत्रकार परिषद
संजय राऊत शिवसेना भवनात दाखल
शिवसैनिकांची मोठी घोषणाबाजी
मुंबई जिंकणे हे भाजपचे केवळ स्वप्न-कार्यकर्ते
सेनाभवनात शिवसैनिकांची मोठी गर्दी
संजय राऊतांना सेनाभवनात नेताना मोठी गर्दी
संजय राऊत शिवसेना भवनाच्या आत दाखल
संजय राऊत दाखल झाल्यावर शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह
शिवसैनिकांची भाजवविरोधात जोरदार घोषणाबाजी
गर्दीतून मार्ग काढत शिवसैनिकांची गाडी पुढे
बर्दाश किया अब बर्बाद करेंगे नारा खरा ठरणार?
संजय राऊत शिवसेना भवनात दाखल
कोणत्या घोटाळ्याचा गौप्यस्फोट?
संजय राऊतांना सुरक्षा रक्षकांचा गराडा
सेनाभवनात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली
काही मिनिटात राऊतांची पत्रकार परिषद
संजय राऊत काय बॉम्ब फोडणार
भाजप नेत्यांची ऐनवेळी दिल्ली वारी
भाजप नेत्यांबाबत बोलणं राऊतांनी टाळलं
मोठ्या संख्येनं शिवसैनिक सेना भवनात दाखल झाले आहेत. बहुप्रतीक्षित पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातले शिवसैनिक सेना भवन परिसरात दाखल झाले आहेत.
आदेश बांदेकरसह अनेक नेते सेना भवनात दाखल, संजय राऊतही सामना कार्यालयातून सेना भवनाच्या दिशेनं निघाले
संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी रवाना
संजय राऊत सामनाच्या कार्यालयातून निघाले
काही मिनिटात राऊतांची पत्रकार परिषद
अभी तो टॉस हुआ है – आदित्य ठाकरे
पत्रकार परिषद म्हणजे सिक्सर आहे – सुप्रिया सुळे
शिवसेना भवनाबाहेर मोठं स्क्रीन – बातमी
अरे, पत्रकार परिषद आहे की क्रिकेटची मॅच आहे??
–
अमेय खोपकर
उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 15, 2022
भाजप नेत्यांची दिल्ली वारी
किरीट सोमय्याही दिल्लीला रवाना
भाजप नेत्यांच्या अचानक दिल्ली वारीने चर्चांना उधाण
संजय राऊतांकडे कुणाची फाईल? कुणाचा व्हिडिओ
संजय राऊत यांचे पक्षातील निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी आणि बाळा कदम सामनात दाखल
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला पुण्याहून शिवसैनिक मुंबईकडे निघालेत,
– शिवाजीनगरहून मुंबईकडे रवाना,
– शिवसेना शहरप्रमुखांसह नगरसेवक आणि शिवसैनिकांचा समावेश,
– किरीट सोमय्यांना धक्काबुक्की प्रकरणातील शिवसैनिक मुंबईकडे रवाना,
संजय राऊत दरोरोज नऊ वाजता पत्रकार परिषद घेतात त्यात काही नवीन नाही..
रोज पोपट येऊन बोलतात.त्यांना सवय झाली आहे. त्यात काहीच नसते.
चोर की दाढि मे चूगार अशी त्यांची परिस्थिती आहे.त्यांना ईडी ची भीती वाटत आहे…
तुमचे काळे धंदे असेल तर ते ही बंद होईल,संविधान ला मागे ठेऊन हे सरकार काम करत आहे..
खा. नवनीत राणा यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका…
मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की गडकरी चौक, दादर, मुंबई येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल गार्डन ते गडकरी जंक्शन ते राजबढे चौक दोन्ही वाहिनीवर दुपारी 14.00 ते 18.00 वा पर्यंत वाहतुक संथ गतीने चालू राहू शकते. कृपया आपण नमूद वेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 15, 2022
जयप्रभा स्टुडिओ सिनेसृष्टीसाठी वापरता यावा हे कोल्हापूरकरांची पहिल्यापासूनच भावना
लतादीदींच्या स्मृती जपण्यासाठी जयप्रभा स्टुडिओत स्मारक करण्यासंदर्भात अनेकांनी भूमिका
मात्र आता याची विक्री झाल्याचे समोर आले
आता या जागेबाबत शासन स्तरावर काय करता येईल याबाबत विचार करून
जागेची किंमत ठरवून जयप्रभा स्टुडिओ जागा घेता येईल का यासाठी प्रयत्न करू
चित्रनगरीला जयप्रभा स्टुडिओ जोडता येईल का या ही दृष्टीने ही प्रयत्न करणार
मूळ मालक मंगेशकर कुटुंबीय आहेत आता विक्री झाली आहे त्यामुळे या वादात पाडण्यात अर्थ नाही
मंगेशकर कुटुंबाने ही स्मारका बाबत वाद करू नये अशी भूमिका घेतली आहे
आता मागे काय घडलं यापेक्षा पुढे चांगलं काय करत येईल हे पाहूया
वादानंतर मूळ मालकांनी केलेल्या मागणीवर शासकीय स्तरावर चर्चा सुरू होईल त्यावेळी यावर बोलता येईल
अमित देशमुख, एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊ
मालकांकडून लेखी मागणी आल्या शिवाय निर्णय घेता येणार नाही
जयप्रभा संदर्भात लता दीदी हयात असतांना त्यांची भेट मागितली होती मात्र कोरोनामुळे त्या कोणाला भेटत नव्हत्या
शांततेत पार पडली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया
कोरची नगरअध्यक्ष हर्षलता भैसारे काँग्रेस,
उपाध्यक्ष – हिरा राऊत काँग्रेस
कोरची नगरपंचायत मागील पाच वर्ष शिवसेना अडीच वर्ष भाजप अडीच वर्षे सत्तेत होते
पण आता काँग्रेसने एकहाती सत्ता या ठिकाणी हासिल केलेली आहे
वाघाच्या फोटोवर झुकेंगे नहीं, असं म्हणत शिवसेनेची सेना भवनाबाहेर पोस्टरबाजी
हसीना पारकरच्या घरी चालली तब्बल 4 तास ईडीची छापेमारी, चार तासांच्या छापेमारीनं ईडीचे अधिकारी हसीना पारकरच्या घरातून निघाले
कोल्हापूरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
दसरा चौक ते जिल्हाधिकारी असा निघणार मोर्चा,
केंद्र सरकारने खत़ाची दरवाढ कमी करावी ,पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती कमी करा,
वीज कनेक्शन कापू नका या मागणीसाठी आज काढणार मोर्चा,
राजू शेट्टी करणार मोर्चाचं नेतृत्व,
छोटा शकीलचा नातेवाईक सलिम प्रुट ईडीच्या ताब्यात, गँगस्टर छोटा शकीलचा नातेवाईकला अखेर ताब्यात घेण्यात आलं, आता कसून चौकशी सुरु
आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते आहे.
-देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदी भाजपच्या भारती आहेर यांचा यांची वर्णी…
-विरोधात एकही अर्ज नसल्याने फक्त घोषणेची औपचारिकता बाकी…
-१७ पैकी १५ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारती आहेर यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल न केल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे…
-भाजपचे नेते केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आल्याने केदा आहेर यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे..
सिधुदुर्गमधील नारायण राणेंच्या घरासमोर आंदोलन
पोलिसांचा बंदोबस्त
आंदोलनात नारायण राणेच्या विरोधात घोषणा
ICE चा गैरवापर सुरु आहे, विरोधी पक्षातच नोटीशी कशा येतात, याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, विरोधात असल्या की नोटीस येतात, भाजपमध्ये गेल्या की नोटीस कशा विरघळतात हा प्रश्नच आहे, लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय, असं सुप्रियाा सुळे यांनी म्हटलंय. तसंच गुजरात बँक घोटाळ्यावरुनही त्यांनी हल्लाबोल केलाय. या देशात कुठल्याही राज्यात घोटाळा असेल, तर त्यांची जबाबदारी केंद्राने घ्यावी, इतक्या वर्षाचा हिशोब नको का द्यायला? 7 वर्षाचा हिशोब सांगा, मग चेक्स आणि बँलन्से एकाच कंपनीत कशा राहून केल्या, त्याचं स्पष्टीकरण केंद्रानं द्यावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार,
या भागात कार्यरत कामगारांना झाले दर्शन, या प्रवेशद्वारातून थेट वसाहत आणि कोळसा हाताळणी यंत्राकडे जातो मार्ग,
वीज केंद्राच्या परिसरात वाघासह अन्य वन्यजीव ठरत आहेत कामगारांसाठी धोकादायक,
वनविभाग आणि वीज केंद्र व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्याची गरज
शिवसेना खासदार संजय राऊत सामना कार्यलयात दाखल, आज संध्याकाळी काय बोलणार याकडे लक्ष
शिवसेना भवनात दुपारी 4 वाजता पार पडणार पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष, संजय राऊत मोठे गौप्यस्फोट करण्याची दाट शक्यता
आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये 89 पानी पोलिस तक्रार
7 दिवसात गुन्हा दाखल करणार
राऊतांच्या जवळच्या लोकांवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई का केली नाही.
सुजीत पाटकरला अटक का केली नाही
संजय राऊतांनी नौटकी बंद करावी.
चहावाल्याची नीट चौकशी करा
सुजीत पाठकरला अटक करा
संजय राऊतांना मी मूर्ख वाटलो काय? आता मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण त्याआधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. सोमय्यांचा राऊतांना थेट चॅलेंज
किरीट सोमय्या यांनी 89 पानांची तक्रार आझाद नगर पोलिस स्थानकात दिली आहे. राऊतांच्या निकटवर्कीय पाटकर यांनी कोविड पेशंटच्या जीवाशी खेळ केला, धंदा केला,कोट्यवधी रुपये लाटल्याचा पुन्हा एकदा आरोप सोमय्यांनी केलाय. सुजीत पाटकरला एकूण 13 कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. पाटकर विरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. सात दिवसांत एफआयआर दाखल करा, नाहीतर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये केस फाईल करणार, अशा इशारा त्यांना दिलाय. इटरनर हेल्थ केअरचं रजिस्ट्रेशन करताना बोगस कागदपत्र दिल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
आजच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच संजय राऊत यांनी सकाळी सेना भवनाबाहेरुन फोटो ट्वीट करत आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे.
जय महाराष्ट्र pic.twitter.com/pZwS2WCXWg
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 15, 2022
शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले
संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित
घोषणाबाजी देत शिवसेनेचे नेते निघाले