नाना पटोले की बाळासाहेब थोरात? काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर, संजय राऊत कुणाकडून? ‘या’ नेत्याचं घेतलं नाव!

| Updated on: Feb 06, 2023 | 10:07 AM

संजय राऊत सध्या संसदेच्या अधिवेशना निमित्त दिल्लीत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आता दिल्ली दरबारी पोहोचल्याने पक्षांतर्गत वाद असला तरी यावर बोलायचा हवं, संजय राऊत म्हणाले. 

नाना पटोले की बाळासाहेब थोरात? काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर, संजय राऊत कुणाकडून? या नेत्याचं घेतलं नाव!
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे दोन महत्त्वाचे नेते नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रियेदरम्यान ही धुसफूस दिसून आली. आता निकालानंतर दोन्ही नेत्यांनी उघड भूमिका घेतली आहे. सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करणं आता अशक्य असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली.

नाना पटोले यांच्यामार्फत तांबे-थोरातांविरोधात राजकारण सुरु असल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यावर काय म्हणाले ते महत्त्वाचं आहे. राऊत म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल मला नेमहीच आदर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्ष आणि सरकार चालवण्यास खूप मदत केली. त्यामुळे त्यांच्याबाबत माझ्या मनात नेहमीच आदर कायम आहे..

काँग्रेस नेत्यांशी चर्चा

संजय राऊत सध्या संसदेच्या अधिवेशना निमित्त दिल्लीत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आता दिल्ली दरबारी पोहोचल्याने पक्षांतर्गत वाद असला तरी यावर बोलायचा हवं, संजय राऊत म्हणाले.  तेथील काँग्रेस नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली. माझं मत विचारलं,त्यामुळे त्यांच्याकडे मी माझी ही भूमिका मांडली, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली.

शिवसेनेच्या मित्रपक्षांकडून मविआची कोंडी?

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र शिवसेनेशी युती करणारे वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड हेदेखील या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांकडून तशी तयारी दर्शवली जातेय. असे झाल्यास शिवसेनेच्या मित्र पक्षांकडून महाविकास आघाडीची कोंडी केल्याचे चित्र निर्माण होईल.

संजय राऊत यांनी यावरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक नाही. तर संभाजी ब्रिगेडशी यासंदर्भात बोलून आम्ही चर्चा करू..