मुंबई : आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांची एक वादळी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना समर्थन देण्याची मागणी शिवसेना खासदारांकडून करण्यात आली. त्याबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचार करून निर्णय घ्यावा असेही खासदारांनी याच बैठकीत पक्षप्रमुखांना सांगितलं. या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. संजय राऊत यांचा खासदारांच्या भूमिकेला विरोध असल्याचेही चर्चा बाहेर आल्या होत्या. मात्र पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल, मी नाराज नाही म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ही द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांनाच निवडणुकीत पाठिंबा देणार का? असा सावल उपस्थित झालाय.
तर बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रपती निवडणुकींबाबतही चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणाच्या पलिकडे जाऊन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला आहे. सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना दिला आहे. त्यांचा आदेश बंधनकारत आहे. त्यामुळे मी नाराज नाही, जो पक्षाचा निर्णय असेल. त्याला माझा पाठिंबा असेल. अशा बातम्या कुणीही चालवू नको. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या मागे सर्व खासदार उपस्थित राहतील, अशी प्रतिक्रिया नाराजीच्या वृत्तावर संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी या बैठकील चर्चेबाबत आणि खासदारांच्या उपस्थितीबाबत भाष्य केलं आहे. संजय मंडलिक दिल्लीत आहे, तसेच कलाबेन पोहोचू शकल्या नाहीत, तसं त्यांनी कळवलं होतं हजर न राहण्याबाबत, तसेच इतर खासदारांनीही सांगितलं होतं. मात्र श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याबाबत माहिती नाही. हे फक्त दोन खासदार बैठकीला उपस्थित नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तर शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची आहे. ती दुसऱ्या कुणाचीही नाही. कुणाला पदावर ठेवण्याचे आणि हटवण्याचे अधिकारही त्यांचेच आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे सर्वांचेच गुरू होते. तसे गुरू लाभणे हे आमचं भाग्य आहे. त्यांनी आम्हाला दिशा दाखवली. आम्हाला त्यांनी पुढे नेलं. त्यांनी शिवसेना निर्माण केली. या गुरूला मानवंदना देणं हे आमचं कर्तव्य आहे तसेच उद्धव ठाकरे आता शिवसेनचे नेतृत्व करत आहेत. तेही आता गुरूस्थानी आहेत, त्यामुळे जे नेतृत्व करतात ते गुरूस्थानी असतात, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.