मुंबई : राजकारणात (Politics) काही लोकांनी डबकं तयार केलंय. डबक्यात बेडूक राहतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं स्वतः त्या डबक्यात उतरू नये. कारण तसं काही केलं तर फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांची अप्रतिष्ठा होईल, असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी दिल. राऊत म्हणाले, मला खात्री आहे की, ते या डबक्यात आणि नरकात उडी मारणार नाहीत. सध्या डबक तयार झालं. त्या डबक्यामध्ये स्वतःला राष्ट्रीय पक्ष (National Party) म्हणणाऱ्या मोदींचं नेतृत्व सांगणाऱ्या पक्षानं त्या डबक्यात उतरू नये. देवेंद्र फडणवीस यांच्यात क्षमता आहे. ते डबक्यात उतरणार नाही, अशी मला खात्री आहे, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बैठका होत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडं बऱ्यापैकी आमदारांचं बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात निर्माण झाला नव्हता. त्यामुळं हा विरोध पक्ष चांगल्या प्रकारे विरोधात काम करू शकतो. महाराष्ट्राला पुढं नेऊ शकतो. ही आमची कायम भूमिका राहिली. देवेंद्र फडणवीस यांच्यात ती क्षमता आहे. त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलंय. पण, त्यांनी आता सध्या जे डबक झालं त्यात उतरू नये. असं केलं तर त्यांनी अप्रतिष्ठा होईल. असं माझं फडणवीस यांना मित्र म्हणून सांगणं आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
11 जुलैनंतर आमच्या मागणीवर विचार होईल. गुवाहाटीला गेलेल्या काही लोकांना बंडखोर मानायला आम्ही तयार नाहीत. ते मुंबईत येत नाही तोपर्यंत आशावादी आहोत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. राऊत म्हणाले, राज्यातील लोकभावना तीव्र आहेत. अकोल्यात 25 हजार लोकं काल रस्त्यावर होती. राज्यात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला जात आहे. लवकरच ठाण्यातही हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेला माननारी जनता अशा कोणत्याही विचाराला स्थान देत नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय.