मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मेसेज केला होता, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. मात्र या मेसेजमागील कारण आपल्याला माहित नसल्याचं अजित पवार म्हणाले. ‘साहेब, जय महाराष्ट्र! मी संजय राऊत.’ अशा आशयाचा मेसेज राऊत यांनी केल्याचं अजित पवार (Sanjay Raut Sends Message to Ajit Pawar) यांनी सांगितलं.
‘काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी मला मेसेज केला. मी बैठकीत असल्यामुळे रिप्लाय करु शकलो नाही. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मला मेसेज का केला, हे माहिती नाही. मी थोड्या वेळात त्यांना फोन करुन विचारेन’ असं अजित पवार म्हणाले.
‘साहेब, जय महाराष्ट्र! मी संजय राऊत.’ अशा आशयाचा मेसेज संजय राऊत यांनी केल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांना वाचून दाखवलं. त्यामुळे शिवसेना सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची मदत घेणार का, या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
Ajit Pawar, Nationalist Congress Party: I received a message from Sanjay Raut a while ago, I was in a meeting so couldn’t respond. This is the first time after elections that he has contacted me, I don’t know why he has messaged me. I will call him in a while. #Maharashtra pic.twitter.com/HAjKqBlsY3
— ANI (@ANI) November 3, 2019
शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठीच्या अंतिम निर्णयापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहचले आहेत. सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा शब्द शिवसेनेला भाजपने कधीच दिला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात सुरु असलेली बोलणी फिस्कटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
याआधी, भाजप विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यास दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करु शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) आणि इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा 170 पर्यंत जाईल, असं म्हणत शिवसेनेचं सरकार येण्याची शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच, शपथविधी शिवतीर्थावर : संजय राऊत
विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.
शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत आहे.
भाजपला 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 116 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
भाजपला पाठिंबा दिलेले आमदार
शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार
यांचा पाठिंबा कोणाला?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)
महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01) <भाजपला पाठिंबा>, स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
Sanjay Raut Sends Message to Ajit Pawar