मुंबई: राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधक गोंधळ घालण्याची चिन्हे आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे. गोंधळ म्हणजे रणनीती नाही. त्यामुळे अधिवेशन गोंधळात वाहून जाऊ देऊ नका, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे. (Sanjay Raut slams opposition leader over maharashtra assembly session)
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना खडेबोल सुनावले. गोंधळ म्हणजे रणनीती नाही. अधिवेशन चालू न देणे याला रणनीती म्हणणार का? अशी रणनीती समोरून देखील होऊ शकते, पण दोन दिवसाचे अधिवेशन गोंधळात वाहू देणार का?, असा सवाल राऊत यांनी केला. राज्यापुढे अनेक प्रश्न आहे. एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यावर चर्चा होऊ शकते. कोरोनावर चर्चा होऊ शकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे किंवा सरकारचे अनेक मुद्दे असू शकतात. ते राज्याच्या हिताचे असू शकतात. त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. कायदे होणे गरजेचे आहेत. ठराव मंजूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षाने विधिमंडळाचे कामकाज पूर्ण वेळ चालू देणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष स्वतःला महाराष्ट्राचे समजत असतील, त्यांना महाराष्ट्राचे हित व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी दोन दिवस पूर्ण वेळ अधिवेशन चालू द्यावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात मी काम करतोय. त्यामुळे मला माहीत आहे तिथे काय चालतं, असं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तीन पक्षांनी कृषी कायद्याबाबतचा ठराव केला आहे. म्हणजे तीन पक्षांचे एकमत आहे, असं त्यांनी सांगितलं. (Sanjay Raut slams opposition leader over maharashtra assembly session)
संबंधित बातम्या:
हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, संजय राऊतांचं सूचक ट्विट
कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील: राऊत
एनडीए असो की यूपीए ओबीसींना न्याय हक्क मिळाला नाही; महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर
(Sanjay Raut slams opposition leader over maharashtra assembly session)