कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

| Updated on: Nov 23, 2020 | 1:08 PM

कराचीही एक दिवस भारताचा भाग होईल" असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता.

कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला
Follow us on

मुंबई : “आधी पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीचं (Karachi) नंतर बघू” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. कराची एक दिवस भारताचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले होते. (Sanjay Raut takes dig at Devendra Fadnavis who said Karachi will be a part of India one day)

मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, असा इशारा शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्र्यातील दुकान मालकाला दिल्यानंतर वादाला तोंड फुटलं. संजय राऊत यांनी तात्काळ ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

‘निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,’ असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.

“आम्ही ‘अखंड भारत’ संकल्पनेवर विश्वास ठेवतो. कराचीही एक दिवस भारताचा भाग होईल” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता.

फडणवीसांच्या वक्तव्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की आधी पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग पुन्हा भारतात आणा. कराचीचं आपण नंतर बघू.

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती

अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. याच विषयी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांचे ताळतंत्र सुटलंय. पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय. भाजप नेते भ्रमिष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली.

संबंधित बातम्या :

शपथविधीला 1 वर्ष पूर्ण, अमावस्येचा फेरा, विरोधकांच्या डोक्यावर परिणाम, संजय राऊतांचा हल्लाबोल

नितीश कुमारांनी लव्ह जिहादबाबत कायदा करावा, संजय राऊतांचं चॅलेंज

(Sanjay Raut takes dig at Devendra Fadnavis who said Karachi will be a part of India one day)