मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून आणि सकाळी 9.30 वाजताच्या पत्रकार परिषदांमधून भाजपची झाडाझडती घेण्याचा नित्यनियम सुरु ठेवला असतानाच, भाजपवासी झालेले माजी खासदार निलेश राणे यांनीही राऊतांवर एकेरी भाषेत ‘ट्वीटहल्ला’ करण्याची सवय मोडलेली नाही. ‘संजय राऊत वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत’ अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी (Sanjay Raut Trolled on Twitter) केली.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मीटिंग करायची ह्यांनी, एनडीएची मीटिंग शिवसेनेने नाकारली, पण संजय राऊत गल्लीतल्या त्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत, जे सगळं ठीक असेल, तरी सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालतात.’ असं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे. या ट्वीटमध्येही निलेश राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख केला आहे.
“शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला त्यांच्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढले, आता तुमची उलटी गिनती सुरु”
‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा प्रश्न भाजपला केला होता. त्यावर “शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला त्यांच्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढले, आता तुमची उलटी गिनती सुरु” या मथळ्याखाली ‘टीव्ही9 मराठी’ने केलेल्या बातमीचा ट्वीट कोट करत निलेश राणे यांनी विखारी टीका केली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मीटिंग करायची ह्यानी, एनडीए ची मीटिंग शिवसेनेने नाकारली पण संज्या राऊत गल्लीतल्या त्या कुस्क्या म्हाताऱ्या सारखा आहे जो सगळ ठीक असेल तरी सोसायटीच्या वॉचमनशी उगाच ऊज्जत घालतो. https://t.co/lCPgrWMUDX
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 19, 2019
याआधी, संजय राऊत अँजिओप्लास्टीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले असतानाही निलेश राणेंनी ‘अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्याने संजय राऊत मुद्दाम आडवे झाले आहेत’ असा घणाघात केला होता. तर त्याआधी ‘मला तर वाटतंय येत्या काही दिवसांत संजय राऊत यांना शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील’ असंही ट्वीट निलेश राणे यांनी केलं होतं.
‘संजय राऊतांना काही दिवसांत शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील‘
‘संजय राऊत इतके गरीब आहेत, की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहू द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या, अशी टीका निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
संजय राऊत यांना टीव्ही, तर उद्धव ठाकरेंना कॅडबरी द्या : निलेश राणे
राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील वाद जुना आहे. राज्यात सत्तास्थापनेवरुन संघर्ष सुरु असताना नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं होतं. परंतु निलेश राणे यांनी तिखट भाषेत समाचार (Sanjay Raut Trolled on Twitter) घेण्याची परंपरा सुरुच ठेवली आहे.
‘अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्याने संजय राऊत मुद्दाम आडवे’