मुंबई : “शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीनंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले (Sanjay Raut vs Udayanraje Bhonsale) यांच्यावर हल्ला चढवला. उदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत असतील,शरद पवारांबाबत बोलत असतील, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही लोकशाहीत उत्तर देण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर इतरांच्या श्रद्धास्थानाबद्दल बोलत असाल, तर तुम्हालाही ऐकून घ्यावं लागेल. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगडे तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही, कारण तंगडी सगळ्यांना आहेत”, असं संजय राऊत (Sanjay Raut vs Udayanraje Bhonsale) म्हणाले.
सगळ्यांना प्रश्न विचारता येतात. जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगडे तोडण्यचा भाषा बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज. महाराष्ट्राची 11 कोटी जनता शिवरायांची वंशज आहे, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी कोल्हापूरचे संभाजीराजे, साताराचे शिवेंद्रराजे यांची स्तुती सुद्धा केली. कोल्हापूरमधील सध्याचे शाहू महाराज यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांचा आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकतंत्रात चालान नाही. तंगड्या सर्वांनाच असतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
“विरोधकांना त्यांचं काम आहे, करु द्या.महाराष्ट्रात विरोधकांचा नेहमीच सन्मान केला जातो. शिवकाळापासून महाराष्ट्रात लोकशाही आहे. कोल्हापूर, साताऱ्याच्या गादीचा आम्हाला आदर आहे. खा.छत्रपती संभाजीराजे माझे मित्र आहेत. सातारचे शिवेंद्रराजे संयमाने काम करतात. अभयसिंहराजेंसारखा सज्जन माणूस राजकारणात नव्हता. उदयराजेंनी छत्रपती शाहूंना प्रश्न विचारायला पाहिजे. उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या शिवसेनेच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. शिवरायांच्या गाद्यांबद्दल शिवसेनेला नेहमी आदर. उदयनराजे हे ठाकरे,पवार,उद्धवजींबद्दल बोलतात. आम्हालाही लोकशाहीत उत्तर देण्याचा अधिकार आहे. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगडे तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही. सामान्य माणूसही उदयनराजेंना उत्तर देईल”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मोदींनाही लोक प्रश्न विचारतात. राष्ट्रपतींनाही लोक प्रश्न विचारतात. ही लोकशाही आहे, तुम्हाला पटत नसेल. लोकशाहीत तंगडे तोडण्याची भाषा चालत नाही. तुम्ही राजकारणाबाहेर असतात तर चालले असते, असं संजय राऊत म्हणाले.
विरोधी पार्टीचे काम असते विरोध करणं. विरोधकांना त्यांचे काम करु द्या. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे नाही तर देशाचे राजे आहेत. महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे, असं राऊतांनी नमूद केलं.
कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसं इंदिरा गांधीही भेटत होत्या, असं संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. देशातील अनेक नेते करीम लालाला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संगटनेला अनेक नेते भेटत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते, असं संजय राऊत म्हणाले.
करीम लालाला अनेक राजकीय लोक भेटायचे. त्यावेळचा माहौल वेगळा होता. करीम लाला पठाण समुदायाचा नेता होता. करीम लालाचा त्यावेळी दरारा होता. सर्वच लोक करीम लालाला भेटायचे. नेहरु,इंदिरा,राजीव गांधींबद्दल आदर आहे, राहील. नेहरुंवरील टीकेवेळी काँग्रेस गप्प, मी मात्र बोलत होतो, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
मी गांधी परिवाराचा सन्मान करतो , विरोधात असताना सुद्धा करत होतो. जे कोणी ट्विट करत आहेत त्यांना सांगा, असं राऊत म्हणाले.