नेहरु, गांधींना मानतो पण सावरकरांचा अपमान करु नका, संजय राऊत यांचा राहुल गांधींवर निशाणा

| Updated on: Dec 14, 2019 | 8:46 PM

सावरकरांवरील या वक्तव्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांचा राहुल गांधींवर निशाणा साधला (sanjay raut warns rahul gandhi) आहे. "आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका" असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे

नेहरु, गांधींना मानतो पण सावरकरांचा अपमान करु नका, संजय राऊत यांचा राहुल गांधींवर निशाणा
Follow us on

मुंबई : “मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही,” असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले (sanjay raut warns rahul gandhi) होते. मात्र सावरकरांवरील या वक्तव्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांचा राहुल गांधींवर निशाणा साधला (sanjay raut warns rahul gandhi) आहे. “आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका” असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. यावरुन महाविकासआघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात (sanjay raut warns rahul gandhi) आहे.

“वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत.” असे ट्विट करत संजय राऊत यांनी राहुल गांधींचे कान टोचले आहेत.

“आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.” असेही ट्विट करत राऊतांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे.


काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाल्याचे दिसत आहे, असं म्हटले होते. या वक्तव्याचा भाजपकडून विरोध करण्यात आला तसेच राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली (sanjay raut warns rahul gandhi) होती.

यावर भाजपला प्रत्युत्तर देताना राहुल गांधींनी “मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. मी सत्य बोललो मग माफी का मागू, मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी”, अशी जाहीर सभेत म्हणाले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरुन महाविकासआघाडीमध्ये फूट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.