महाराष्ट्र तुझी वाट पाहतोय : राऊतांच्या आदित्यला शुभेच्छा

| Updated on: Jun 13, 2019 | 1:40 PM

खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. 'महाराष्ट्र खरचं तुझी वाट पाहत आहे', असे फेसबुकवर पोस्ट करत संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहे.

महाराष्ट्र तुझी वाट पाहतोय : राऊतांच्या आदित्यला शुभेच्छा
Follow us on

 मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज 29 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकतंच खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. ‘महाराष्ट्र खरचं तुझी वाट पाहत आहे’, असे फेसबुकवर पोस्ट करत संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी दिलेल्या या शुभेच्छानंतर राजकारणात आदित्य ठाकरेंच्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी तासाभरापूर्वी फेसबूकच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना संजय राऊत यांनी आदित्य एक फोटो शेअर केला. त्याला कमेंट देताना ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा..महाराष्ट्र खरच तुझी वाट बघत आहे’, असे लिहिले आहे. यावरुन ते लवकरच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र आज वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य यांना पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणूक लढणार का असा प्रश्न विचारला होता. पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

महाराष्ट्र वाट पाहतोय

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करु नये. त्याऐवजी दुष्काळग्रस्त भागासाठी मदत करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी समर्थकांना केले आहे. त्यामुळे आता युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरुन पोस्टर शेअर केले जात आहेत.

सोशल मीडियावरुन शेअर करण्यात येणाऱ्या पोस्टरवर“हीच वेळ आहे, हीच संधी आहे, महाराष्ट्र वाट पाहतोय” असा आशय आणि त्यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. यावरुन आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून, राज्याचं नेतृत्व करण्यासाठी गळ घातली जात आहे.

तसेच आज युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या शुभेच्छा फलकांवरही आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदारांना ‘मातोश्री’वर हजर राहण्याचा निरोप धाडण्यात आला आहे. विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांना निरोप देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिल्यांदाच सर्व शिवसेना आमदारांकडून आग्रह होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आलं तर आदित्य ठाकरेंचं नाव त्यासाठी असू शकतं, अशीही चर्चा रंगली. या सर्व पार्श्वभूमीनंतर आदित्य ठाकरेंसाठी वरळी आणि शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघांची चाचपणीही झाली आहे.

संबंधित बातम्या  

आधी डिनर, आता एकाच दिवशी बर्थ डे, आदित्य ठाकरे-दिशा पटाणीचा योगायोग  

दोन मतदारसंघांची चाचपणी, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आदित्य विधानसभेच्या रिंगणात?

हीच वेळ, हीच संधी, महाराष्ट्र वाट पाहतोय, आदित्य ठाकरेंसाठी मोर्चेबांधणी सुरु  

महाराष्ट्र आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल : संजय राऊत    

आदित्य ठाकरेंकडून विधानसभेसाठी या दोन मतदारसंघांची चाचपणी? 

 EXCLUSIVE : तुम्ही निवडणूक लढणार का? आदित्य ठाकरे म्हणतात…    

स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?